अशोकराव मासाळे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा


सांगली | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
श्री डेव्हलपर्स अॅन्ड कन्सल्टंटचे सर्वेसर्वा, सांगली टिंबर मर्चंट पतसंस्थेचे संचालक, यशस्वी उद्योजक अशोकराव मासाळे यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना प्रत्यक्ष भेटून आणि फोनवरुन शुभेच्छा दिल्या.

समाज प्रबोधन आणि परिवर्तनाच्या कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे, सर्वसामान्यांविषयी तळमळ असणारे उद्योजक अशोकराव मासाळे यांचा तरुणांची प्रगती आणि रोजगार उपलब्धीकडे कल असतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त ठिकठिकाणी विविध उपक्रम घेण्यात आले. गरीब व गरजू मुलांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी टिंबर मर्चंट पतसंस्थेच्यावतीने संचालक मासाळे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अध्यक्ष यशवंतराव माळी, उपाध्यक्ष राजेंद्र मुळीक, संचालक श्रीकांत बाणकर, सुरेश इरळे, परद्दीन शेख, शहेनशाह मकानदार, रमेश खताळ, मॅनेजर श्रीकृष्ण मोहिते, सभासद व्यापारी उपस्थित होते.

अशोकराव मासाळ यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, धनेश शेटे, अक्षय मासाळे, प्रशांत रणधीर, सतीश डोंगरे, अक्षय माळी आदी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.