आरोग्य सेवेत रक्तदान महत्त्वाचे : शेती मित्र अशोकराव थोरात


कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
आज घडीला देशातील व महाराष्ट्रातील सामाजिक परिस्थिती राजकीय वस्तुस्थिती आरोग्य क्षेत्रातील कमतरता व नवे नवे आजार व पर्यावरण बिघडलेले पाहिले तर मानवाला अतिशय दर्जेदार व तत्पर आरोग्य सेवेची आज गरज आहे.

       नैसर्गिक आपत्ती अपघात व माणसाला जडणारे विविध आजार पाहिले तर आरोग्यामध्ये रक्तदान व अवयव दान करणे महत्त्वाचे आहे गरीब गरजू रुग्णांना वेळेवर मोफत रक्तपुरवठा होणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे.

      यासाठी मळाई ग्रुप व समाजातील चांगल्या प्रकृतीच्या, उदार मनाच्या रक्तदात्यांकडून रक्तदानाची अपेक्षा वाढत चालली आहे. गेली अनेक वर्षे नियमितपणे रक्तदान शिबिर आयोजित करून आत्तापर्यंत हजारो बाटल्या रक्त जमा केले आहे.

   यशवंत ब्लड बँक कराड व महालक्ष्मी ब्लड बँक कराड यांच्या अध्यायावत लॅबरोटरीच्या सहाय्याने रक्तदान शिबिर आयोजित केले आहे रक्तदानामध्ये रक्तदात्यास कोणताही धोका नाही उलट रक्तदात्यांनी दिलेल्या रक्ताच्या हजारो रुपये किमतीच्या तपासण्या मोफत करून मिळतात.

भविष्यात रक्तदात्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना रक्ताची गरज भासल्यास मोफत रक्तपुरवठा केला जातो.अनेकांना आजपर्यंत या माध्यमातून रक्तपुरवठा केला आहे.

रक्तदानासाठी नाव नोंदणी चालू आहे रक्तदात्यांना ऑनलाईन नोंदणी सुद्धा करता येईल. रक्तदान शिबिर बुधवार दि. 04/01/2023 रोजी आदर्श ज्युनिअर कॉलेज, मलकापूर येथे सकाळी 9.00 ते दुपारी 3.30 या वेळेत होणार आहे. तरी जास्तीत जास्त तरुण पुरुष व महिलांनी या शिबिरात रक्तदान करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

रक्तदानासाठी संपर्क डॉक्टर सौ स्वाती थोरात 9823552636 ,महेश सावंत 9823271433, शेखर शिर्के 9881345839, सर्जेराव शिंदे 9822975232 तसेच ऑनलाइन नोंदणीसाठी खालील लिंकचा वापर करा. https://forms.gle/1Rts3eiBhuaBRiFc6