महादेव शिंदे यांचा आनंदराव चव्हाण पतसंस्थेच्या वतीने सत्कार.
कराड : महादेव शिंदे यांचा सत्कार करताना चेअरमन अभिजित पाटील समवेत निलेश काळे व समरजीत देसाई 
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
महादेव गणपती शिंदे यांची दि कराड अर्बन को ऑफ बँक लिमिटेड बँकेच्या संचालक पदी निवड झाली.

महादेव शिंदे हे आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादित; मंद्रुळकोळेचे शाखा मार्केटयार्ड कराड येथील सल्लागार सदस्य म्हणून देखील आहेत.

त्यांच्या या निवडी बद्दल विविध स्तरातून त्यांच्यावर अंभिनंदन होत आहे. आनंदराव चव्हाण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन अभिजित पाटील (दादा) यांनी त्यांचा सत्कार करत विशेष अभिनंदन केले. या वेळी शाखाप्रमुख निलेश काळे व समरजीत देसाई उपस्थित होते.