गणित प्रज्ञाशोध परीक्षेत सारंग शेवाळे राज्यात प्रथम. अभिनंदनाचा वर्षाव.पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

मोरणा शिक्षण संस्थेच्या वत्सलादेवी इंग्लिश मिडियम स्कूल दौलतनगर या विदयालयाचा विदयार्थी कु.सारंग सुनिल शेवाळे इ.7वी या विदयार्थ्याने भारती विदयापीठ पुणे यांच्या संयुक्त विदयमानाने सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या गणित प्रज्ञाशोध परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविलेला आहे,त्याबद्दल त्याचे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री व सातारा व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार शंभूराज देसाईसाहेब,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.श्री.रविराज देसाई दादा,सचिव मा.श्री.डी.एम.शेजवळ दादा,लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव मा.श्री.एन.एस.कुंभार सर,मोरणा शिक्षण संस्थेचे सर्व संचालक ,विदयालयाच्या मुख्याध्यापिका मा.सौ.योगिता संकपाळ मॅडम,सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व विदयार्थी यांनी कु.सारंग शेवाळे यांचे अभिनंदन केले.