नवभारत पतसंस्थेचेच्या आगाशिवनगर शाखेचा १० वा वर्धापनदिन उत्साहात संपन्न.

सारंग बाबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्धापन दिन संपन्न. सारंग बाबा पाटील यांचे स्वागत करताना संस्थेचे संस्थापक संजय देसाई, चेअरमन सौरभ देसाई व इतर मान्यवर
मलकापूर| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
सहकारातुन समाजसेवा हे व्रत स्वीकारुन सातारा जिल्ह्याचे माजी शिक्षण, अर्थ व क्रीडा सभापती जि.प.सातारा व संस्थापक अध्यक्ष संजय देसाई यांनी सन २००६ साली नवभारत ग्रामीण बीगर शेती सहकारी पतसंस्था,तळमावले ता पाटण या ठिकाणी स्थापना करून सर्वसामान्य लोकांच्या आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहकार्य होऊ लागले हळुहळू या संस्थेने शाखा विस्तार करत कराड मलकापूर शहरालगत अगाशिवनगर या ठिकाणी सन २०१२ रोजी शाखा सुरू करण्यात आली.  

उपस्थितांना मार्गदर्शन करताना सारंग बाबा पाटील.

याच शाखेच्या १० वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने सत्यनारायण पुजा आयोजित करण्यात आली होती.यावेळी पुढील मान्यवर मंडळी कार्यक्रमास उपस्थित राहून संस्थेच्या भावी वाटचालीस भरभरून हार्दिक शुभेच्छा दिल्या मा श्री सारंग बाबा पाटील (प्रदेशाध्यक्ष, माहिती तंत्रज्ञान विभाग रा.कॉ.पार्टी ), मा सौ निलम येडगे मँडम (नगराध्यक्ष, मलकापूर नगरपालिका) ,मा श्री सुनील पाटील, मा श्री हर्षवर्धन मोहिते (संचालक, कृष्णा सह.बँक लि.रेठरे ब्रु.), मा श्री राजेंद्र यादव (बांधकाम सभापती मलकापूर नगरपालिका ), मा श्री पै.नयन निकम ( महाराष्ट्र चँम्पीयन ) , मा अँड ऋषीकांत भोसले (तज्ञ संचालक व कायदेविषयक सल्लागार नवभारत पतसंस्था) , मा श्री सतीशराव धुमाळ (माजी जि.प.सदस्य सातारा), मा श्री संभाजीराव थोरात (शिक्षक नेते, महा राज्य.प्राथ.शिक्षक संघ) , मा श्री बळवंतराव पाटील (माजी अध्यक्ष, सातारा जिल्हा प्राथ.बँक), मा शिवाजीराव मोरे (सरपंच,मोरेवाडी (कुठरे) ग्रामपंचायत ) मा सौरभ देसाई (चेअरमन नवभारत पतसंस्था,तळमावले), मा श्री महेश ताईगडे (व्हा.चेअरमन नवभारत पतसंस्था,तळमावले) मा श्री दादासाहेब शेडगे ( संचालक नवभारत पतसंस्था), मा सुहास पाटील सुपने (संचालक नवभारत पतसंस्था) 

मा अमोल माने (व्यवस्थापक, नवभारत पतसंस्था), मा सुभाष माने (शाखा प्रमुख) इ.मान्यवर मंडळी तसेच शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, कृषी, वैद्यकीय, सहकार , व्यापरी वर्ग विविध गावचे आजी - माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य ,सोसायटीचे आजी - माजी चेअरमन, संचालक, पत्रकार बंधू , संस्थेचे संचालक, ठेवीदार, हितचिंतक कार्यक्रम मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. संस्थेच्या तज्ञ संचालक व कायदेविषयक सल्लागार पदी मा अँड ऋषीकांत भोसले यांच्या निवडीचे पत्र मा श्री सारंग बाबा पाटील व मा श्री संजय देसाई साहेब या दोघांच्या शुभहस्ते देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.

१० वा वर्धापन दिनाच्या निमित्ताने अगाशिवनगर शाखेत महिला समिती निर्माण केली आहे या सर्व महिला समितीच्या सदस्यांचा सत्कार मा सौ निलम येडगे (नगराध्यक्ष, मलकापूर नगरपालिका ) मँडम यांच्या शुभहस्ते शाल, श्रीफळ व बुके देऊन करण्यात आला. लवकरात लवकर पुणे येथे धनकवडी व धायरी शाखेचा विस्तार होणार आहे असे प्रतिपादन मा श्री संजय देसाई साहेबांनी केले.कार्यक्रमाचे नेटके नियोजन व परिश्रम संस्थेच्या सर्वच पदाधिकारी व सेवक वर्गांनी केले कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा सचिन पुजारी सर व आभार मा श्री दादासाहेब शेडगे सर यांनी मानले...