जिल्हास्तरीय वेटलिफ्टींग स्पर्धेमध्ये मळाई देवी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
शालेय क्रीडा विभागाच्या वतीने ओगलेवाडी येथे पार पडलेल्या शालेय जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धेमध्ये मलकापूर येथील श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेच्या आदर्श जुनिअर कॉलेज व आ.च.विद्यालयाचे विद्यार्थी कु.सिद्धी प्रकाश पवार, रोहन गणेश परियार, यश शंकर हजारे यांनी प्रथम क्रमांक मिळवून शाळेच्या लौकिकात भर घातली आहे. सदर विद्यार्थ्यांची सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथील विभागीय स्तरावर निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार संस्थेच्या व विद्यालयाच्यावतीने आयोजित केला होता. याप्रसंगी संस्थेचे सचिव मा. अशोकराव थोरात म्हणाले विद्यार्थ्यांची कठोर परिश्रम करण्याची इच्छा व पालकांचे पाठबळ असेल तर कोणतेही यश खेचून आणता येते. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचे सत्कारमूर्ती आहेत. सौ पद्मा परीयार यांनी पालक प्रतिनिधी म्हणून मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ ए.एस.कुंभार यांनी केले. सूत्रसंचालन शरद तांबवेकर यांनी केले तर आभार उपमुख्याध्यापक श्री ए.बी. थोरात यांनी मानले. या विद्यार्थ्यांना श्री डी व्ही कवळे ,सौ.एस.टी.कांबळे, श्री जे. एन. कराळे व कोच सुजल लाडी, विश्वजीत चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास श्री उत्तम पवार, सौ पद्मा परियार, श्री शंकर हजारे,पर्यवेक्षक श्री भरत बुरुंगले यांची प्रमुख उपस्थिती होती.