अन्यायाविरुद्ध ताकद उभी करा : माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
संकटावर, परिस्थितीवर मात करत सकारात्मक राजकीय परिवर्तन घडवून स्व. भाऊ मोकाशी यांनी केलेले कार्य अलौकिक आहे. भाऊंचे कर्तृत्व व विचार समाजाला दिशादर्शक आहेत. भविष्यातही भाऊंचे विचार आणखीन जोमाने पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन माजी सार्वजनिक बांधकाम व पर्यटन मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी केले. 

येथील श्रीराम नागरी सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष स्व. वि. स. तथा भाऊ मोकाशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

यावेळी प्रसिद्ध वक्ते प्रा.श्रीधर साळुंखे, कोयना शिक्षण संस्थेचे जनरल सेक्रेटरी अमरसिंह पाटणकर, कोयना शिक्षण संस्थेचे सदस्य संजीव चव्हाण, पाटणच्या नगराध्यक्षा मंगल कांबळे, उपनगराध्यक्ष सागर पोतदार यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. अमरसिंह पाटणकर, सुभाषराव पवार, दीपकसिंह पाटणकर यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्ष विलासराव क्षीरसागर यांनी स्वागत केले.