कै.दत्तात्रय उत्तमराव यादव हायस्कूलमध्ये गणित दिवस साजरा


कोळे | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
    श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित, कै. दत्तात्रय उत्तमराव यादव हायस्कूल,आरेवाडी(उत्तर तांबवे) ता. कराड मध्ये गणित तज्ञ श्रीनिवासन रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरा करण्यात आली.

 सदर गणितोत्सव कार्यक्रमात गणित विभागामार्फत विविध कार्यक्रमांचे व प्रदर्शनांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, भित्तीपत्रक, शैक्षणिक साहित्य निर्मिती अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाला विद्यालयाच्या उपक्रमशील मुख्याध्यापिका श्रीमती. पाटील के.बी. मॅडम या अध्यक्षा म्हणून लाभल्या. तसेच आरेवाडी गावचे सरपंच श्री. मधुकर यादव व गमेवाडी गावचे उपसरपंच श्री. वसंत जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. मुरूमकर ए. एम. सरांनी केले. सध्याच्या युगामध्ये गणित विषयाचे विविध क्षेत्रामधील योगदान श्री. मधुकर यादव सरांनी सांगितले. तसेच वेळेचे, कामाचे तसेच आयुष्याचे गणित ज्या माणसाला साधता आले तोच यशस्वी होतो असे प्रतिपादन श्री. वसंत जाधव यांनी केले. विद्यालयाचे गणित विभाग प्रमुख श्री. गंगवणे ए. ए. सर यांनी वैदिक काळापासून भारताने जगाला गणिताची दिलेली देणगी याविषयी मौलिक विचार मांडले. रामानुजन चे कार्य व गणितोत्सवाचे महत्व कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापिका श्रीमती. पाटील के.बी.मॅडम यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयातील नववी तुकडी अ वर्गाची विद्यार्थिनी कुमारी श्रद्धा चव्हाण हिने केले तर आभार विद्यालयाचे शिक्षक श्री. आर.टी. पाटील यांनी मानले.कार्यक्रमाला सौ. ठोंबरे मॅडम, सौ. चव्हाण मॅडम, श्री. कुंभार सर,श्री.देसाई सर,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.