श्री संतकृपा कॉलेज ऑफ फार्मसीच्या डी फार्मसी महाविद्यालयाचे यश


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी डी फार्म, घोगाव या महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी प्रश्नमंजुषा स्पर्धेत यश संपादन केले.

महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल फार्मसी कॉलेजमध्ये महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ यांच्या संयुक्तरित्या आयोजित राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा पार पडली त्यामध्ये कु.अनुजा कुंभार व कु.अक्षदा बेंगडे या विद्यार्थिनींनी द्वितीय क्रमांक पटकावला.

 या स्पर्धेमध्ये राज्यभरातून पदविका फार्मसीच्या सुमारे 100 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता. सदर विद्यार्थिनींना मार्गदर्शन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व प्रा. प्रियांका आलेकरी यांनी केले. 

 या यशस्वी विद्यार्थिनींचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा डॉ. उषा जोहरी, सचिव प्रसुन जोहरी, प्राचार्या डॉ. वैशाली पाटील व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.