श्री मळाईदेवी दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न.


मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
श्री मळाईदेवी नागरी सह. पतसंस्थेच्यावतीने सन २०२३ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संचालक मंडळाच्या हस्ते संपन्न झाले. पतसंस्था गेली ३५ वर्षे शेतकऱ्यांसाठी कार्यरत असून शेती व शेतीविकासाठी संस्थेचे मोलाचे योगदान आहे.संस्थेचे कार्यक्षेत्र सातारा जिल्हा असून संस्थेचे मुख्य कार्यालयासह २० शाखा कार्यरत आहेत. या दिनदर्शिकेमध्ये सर्व प्रकारची माहिती असून सर्वासाठी ती उपयुक्तअसल्याची माहिती संस्थेचे संस्थापक शेतीमित्र अशोकराव थोरात (भाऊ) यांनी दिली.संस्था आर्थिक प्रगतीबरोबरच सामाजिक कार्यातही नेहमी अग्रेसर असते, शालेय विदयार्थ्याना व शाळांना शैक्षणिक साहित्य रूपाने मदत, ५ सप्टेंबर या शिक्षक दिनी गुरूजनांचा सत्कार समारंभ, आपदग्रस्तांना तातडीची मदत, वैदयकीय उपचारासाठी आर्थिक मदत, क्रिडाक्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केलेल्या खेळाडूना आर्थिक मदत असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात.

        श्री. मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेचा एकुण व्यवसाय कोटयावधी रूपयांत असुन ठेवी १२४ कोटी असुन कर्जे ८७ कोटी वाटप करून आर्थिक स्थिती मजबुत केली आहे. संस्थेचे लेखापरिक्षक के.एल.सावंत यांचेकडुन लेखापरिक्षण वेळच्यावेळी करून घेऊन वरचेवर त्यांचे मार्गदर्शन घेतले जाते उपनिबंधक सहकारी संस्था कराडचे श्री. संदीप जाधव व त्यांचे सर्व अधिकारी यांचे सातत्याने मार्गदर्शन घेण्यात लाभते. संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना ते म्हणाले कि, सहकार खात्याचे सर्व निकष मानकांची पुर्तता प्रत्येक वर्षी संस्था करतेच या वर्षी सुध्दा नवीन गुणतक्त्यातील निकषांची पुर्तता संस्थेने पुर्ण केली आहे.याचे श्रेय संस्थेचे संचालक मंडळ, सभासद, ठेवीदार कर्जदार तसेच सेवकांना जाते. या सहकार्याबद्दल अशोकराव थोरात (भाऊ) यांनी त्यांचे आभार मानले. संस्थेने ५२ कोटी ४६ लाख रूपयांची सुरक्षित गुतंवणुक केली आहे. संस्थचे वसुल भागभांडवल ९ कोटी ४७ लाख व खेळते भांडवल १४६ कोटी रू. इतके आहे. संचालक मंडळाने व्यवसाय व्यवस्थापनाचे वेळ प्रसंगी सहकार खात्याच्या बदलत्या धोरणानुसार लवचिकता ठेऊन धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या प्रसंगी संस्थेचे संचालक चेअरमन सौ.अरूणादेवी वि. पाटील, व्हा. चेअरमन सुहास आनंदराव जाधव, मलकापुर नगर परीषदेचे विरोधी पक्ष नेते अजित (काका) थोरात, वसंत चव्हाण, पी. जी. पाटील, दत्तात्रय लावंड, मारूती रावते, नंदकुमार सन्मुख तसेच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सर्जेराव रा. शिंदे व शाखाधिकारी व सर्व कर्मचारी उपस्थित होते.