उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने मालदनचे विजय काळे सन्मानीत.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मालदन (ता. पाटण) गावचे युवा उद्योजक विजय पतंगराव काळे यांना महाराष्ट्र शासन कृषि विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा ) अंतर्गत जिल्हास्तरीय देणेत येणारा उत्कृष्ट शेतकरी पुरस्काराने नुकतेच सन्मानीत करण्यात आले आहे.

त्यांच्या कार्याची दखल घेत उत्कृष्ट गांडूळखत प्रकल्प , सेंद्रिय मसाले गुळ निर्मिती व कृषीमित्र म्हणून शेती क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्या बद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री.राऊत,पाटणचे तालुका कृषि अधिकारी श्री.खरात, कराडचे तालुका कृषि अधिकारी श्री.ताकटे, श्री.मुल्ला व इतर अधिकर्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.

या वेळी दैनिक कृष्णाकाठशी बोलताना विजय काळे म्हणाले की कृषि विभागाची हि कौतुकाची थाप माझ्यासाठी व माझ्यासारख्या कृषि क्षेत्रात काम करणार्‍या तरूणांसाठी नक्कीच प्रेरणादायक ठरेल व यापुढेही शेती क्षेत्रात अशीच कामगिरी करत राहू.

विजय काळे यांनी बीएस्सी अॅग्रीची पदवी संपादन करून नोकरी न करता शेतीविषयक ज्ञानाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. विषमुक्त सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गांडूळ खत, तसेच अन्य उत्पादनांचा निर्मिती उद्योग मालदनला सुरू करून ते यशस्वी उद्योजक बनले आहेत. 

हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.