जनसहकार निधी संस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन उत्साहात संपन्न.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
जनसहकार निधी संस्थेच्या वतीने सन २०२३ च्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा उत्साहात पार पडला.संस्थेचे संस्थापक / चेअरमन श्री.मारुती मोळावडे, व्हा.चेअरमन श्री.अमोल मोरे व संचालक मंडळाच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 

संस्था गेली 4 वर्षे व्यापारी व शेतकऱ्यांसाठी कार्यरत असून संस्थेचे मुख्य कार्यालय तळमावले येथे आहे. तर जनसहकार नागरी पतसंस्थेचे मुख कार्यालय कराड येथे आहे. संस्थेने चार वर्षात येथील जनतेचा, सभासदांचा, ठेवीदारांचा पारदर्शक कारभारामुळे विश्वास संपादन केला आहे.

प्रकाशन सोहळ्यानंतर चेअरमन मारूती मोळावडे म्हणाले की दिनदर्शिकेमध्ये सर्व प्रकारची माहिती असून सर्वासाठी ती उपयुक्त आहे. तसेच संस्थेच्या विविध योजनांबद्दल यात समावेश आहे.

या वेळी संचालक श्री. सुनील आडावकर, श्री.मिलिंद ताईंगडे, श्री. प्रशांत पोतदार, श्री महेश कोकाटे, श्री.आनंदा माने, श्री. सचिन ताईंगडे, श्री. संदीप टोळे, श्री. काशिनाथ जाधव, श्री.संजय माटेकर, तज्ञ् संचालक श्री.महम्मदहनीफ सुतार, संचालिका सौ. सुरेखा नलवडे, सौ. निर्मला मोळावडे सल्लागार श्री.उमेश काळे, श्री. राजाराम चोरगे, श्री. जयेंद्र माने, श्री. जयवंत दिंडे, श्री. तुकाराम धुमाळ, श्री. सतीश सांगावकर, श्री. विलास गोडांबे, श्री. संजय पाटील, श्री. कुमार ठीक, श्री. विकास मोरे, श्री. सुनील पांढरपट्टे, श्री. रमेश ओसवाल, श्री. उत्तमराव जाधव, श्री. प्रकाश बोत्रे, श्री. सुरेश व सर्व कर्मचारी वृंद व व्यापारी बंधू उपस्थित होते.