गलमेवाडीत सत्तांतर; ना.देसाई गटाची बाजी सरपंच पदासह सर्व सदस्य विजयी.


विजयी सरपंच, सदस्य यांचे अभिंनदन करताना बाळासाहेब साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई, माजी चेअरमन विध्यमान संचालक डॉ.दिलीपराव चव्हाण, दत्तात्रय चोरगे व इतर मान्यवर 
कुंभारगांव | कृष्णाकाठ वृत्तसेवा :                        
कुंभारगांव विभागातील गलमेवाडी ता.पाटण येथील दत्तात्रय चोरगे बापू यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत निवडणूकीत ना. शंभूराज देसाई गटाच्या नाईकबा जोतिबा ग्रामविकास पॅनेलचे सरपंच पदासह सर्व उमेदवार विजयी झाले.

या वेळी श्री नाईकबा जोतिबा ग्रामविकास पॅनेलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्य घेत विजयी झाले तर श्री नाईकबा ग्रामविकास पॅनेल चा दारुण पराभव झाला.

मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आणण्यासाठी उमेदवारांनी विशेष यंत्रणा राबवून वृद्ध, अपंग, रुग्णा साठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी पॅनल प्रमुख कार्यकर्ते घेताना दिसून आले होते .

सरपंच पदाचे उमेदवार कुसुम अगस्त चोरगे 271 मते घेत विजयी झाले. सदस्य पदी धोंडीराम चोरगे, रोहिणी चोरगे, सुरेखा चोरगे, आशिष चोरगे, सारिका हारुगडे, स्वप्नील चोरगे, उज्वला चोरगे हे विजयी ठरले. विरोधी पॅनेलला या वेळी पराभवाला सामोरे जावे लागले.

विजयी पॅनेलच्या सर्व सदस्य यांनी गलमेवाडी येथील ग्रामस्थांना भेट देऊन आभार मानले व विजयी मिरवणूक काढत जलोष साजरा केला. या नंतर नाईकबा मंदिरात सांगता सभा झाली यावेळी हारुगडे गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.