मुख्यमंत्र्यांकडून मंत्री शंभूराज देसाई यांना नववर्षाची अनोखी भेट..! ६४ ग्रामपंचायतींना मिळणार विशेष पॅकेज .

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्याने मंत्री शंभूराज देसाई यांचे केले कौतुक..!



पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाणे आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री ना शंभूराज देसाई यांनी पाटण मतदार संघातील ९० पैकी तब्बल ६४ ग्रामपंचायतीमध्ये निर्विवाद सत्ता मिळवून राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडून चोख उत्तर दिले हे खऱ्या अर्थाने बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या राजकीय  उठावाच्या भूमिकेला लोकमान्यता मिळून राजमान्यता मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे मंत्री शंभूराज यांच्या या दैदिप्यमान कामगिरी साठी पाटण मतदार संघातील ६४ ग्रामपंचायतींना तातडीने विशेष पॅकेज देणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांनी केली. दरम्यान नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला पाटण मतदार संघातील जनतेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी ही दिलेली अनोखी भेट असल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली.

               ते पाटण मतदारसंघात मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी आयोजित केलेल्या मतदार संघातील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्य यांच्या भव्यसत्कार कार्यक्रमात ऑनलाईन मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई,मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई,बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार,डॉ.दिलीपराव चव्हाण,विजय पवार ,सुरेश पानस्कर,अभिजित पाटील,बबनराव शिंदे,सोमनाथ खामकर,नामदेवराव साळूंखे,शशिकांत निकम,शिवशाही सरपंच संघाचे अध्यक्ष विजय शिंदे,विजय पवार,बबनराव भिसे,विजयराव जंबुरे,संजय देशमुख,भरत साळूंखे,प्रशांत पाटील,चंद्रकांत पाटील,अशोकराव पाटील,जालंदर पाटील,मनोज मोहिते,नाना साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

                 दरम्यान विकासकामांच्या बाबतीत मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांचे सदैव सहकार्य असून सातारा जिल्ह्याला विकासनिधी कधीही कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केले.



यावेळी मंत्री ना. शंभूराज देसाई पुढे म्हणाले,एका वेगळ्या राजकीय परिस्थिती मध्ये या निवडणूका झाल्या. आमच्या निर्णायानंतर  आदित्य ठाकरे यांचा दौरा सातारा जिल्ह्यात मल्हारपेठ याठिकाणी झाला. एकप्रकारे आम्हाला आव्हान देण्यासाठी ते आले. वंदनीय ठाकरे यांच्या घरातील एका व्यक्ती ने खालच्या पातळीवर आमच्या वरती टीका केल्या. एवढेच नव्हे तर आगामी ग्रामपंचायत निवडणुकीत त्याचा परिणाम दिसेल असे आव्हान बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला देण्यात आले मात्र त्यानंतर लगेचच झालेल्या निवडणकांमध्ये पन्नास टक्के पेक्षा जास्त टक्के मतदान अक्षरशः खेचून आणले आणि बोलणार्यांना चोख उत्तर दिले. एवढेच नव्हे तर आगामी जिल्हा परिषद ,पंचायत समिती तसेच २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मतदार विरोधकांना त्यांची खरी जागा दाखविल्याशिवाय राहणार नाहीत असे स्पष्ट जरून ना देसाई म्हणाले,२०१९ ला आम्ही मत कोणाच्या नावाखाली मागितली हे बँनर काढून बघा मग आम्ही आता काय चूकीचे केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचा पारंपरिक विरोधक आहे. आम्हाला पद दिले मात्र  या राज्यमंत्र्याला काही अधिकार नव्हते त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष शिवसेनेला पोखरु लागल्याचे वेळोवेळी आम्ही नेतृत्वाच्या निदर्शनास आणून दिल्या मात्र तोंड दाबून मुक्याचा मार सहन करावा लागला मात्र  त्यानंतर आम्ही शिवसेना पक्षाला वाचविण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उठाव केला.आणि तो उठाव राज्यातील सर्वसामान्य जनतेने मान्य केल्याचे राज्यातील नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतींच्या निकालावरून स्पष्ट झाले.दरम्यान,देसाई गटाचा नेता अधिवेशनात आहे आणि दुसरी कडे ग्रामपंचायत निवडणुकीत देसाई गटाचा कार्यकर्ते ..!मात्र कार्यकर्ते लढले आणि यशही खेचून आणले ही अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे मात्र सत्तेची हवा कोणीही डोक्यात जाऊ देऊ नका मतदाराला सत्तेचा माज केलेला सहन होत नाही. सामान्य माणसासारखे काम करा. निवडून आला म्हणून बिनधास्त राहु नका. स्वच्छ कारभार करा. लवकरच सर्व सरपंच आणि सदस्य यांच्यासाठी सर्वांसाठी यशदा चे शिबीर आयोजित करणार असल्याचे ही त्यांनी शेवटी सांगितले.

बाळासाहेबांच्या शिवसेनेला ७० टक्के मते..!

पाटण मतदार संघात नुकत्याच निवडणूक झालेल्या एकूण ९० ग्रामपंचायती पैकी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला ६९.२१ टक्के मते पडली तर राष्ट्रवादीला केवळ २१.८ टक्के मते पडली तर ९० पैकी ६४ ग्रामपंचायतीवर निर्विवाद पणे भगवा फडकवून ६४ सरपंच आणि ४५० नवनिर्वाचित सदस्यांचा भव्य सत्कार घेतला असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी मुख्यमंत्री ना एकनाथ शिंदे यांना दिली.

मुख्यमंत्री व्यस्त कार्यक्रमातून ही अर्धा तास ऑनलाईन..!

हिवाळी अधिवेशन संपून काही तास उलटले नाही तरीही आपल्या व्यस्त कामकाजामधून वेळ काढीत राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांनी मंत्री ना. शंभूराज देसाई  यांच्या विनंतीला मान देऊन तब्बल अर्धा तास ऑनलाईन उपस्थित राहिले.यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीवर टोले बाजी करून राज्यातील भाजप शिवसेनेच्या सरकारचा आदर्श कारभार पाहून केवळ उद्धव ठाकरे पक्षातीलच नव्हे तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षातील अनेकजणांचे मोठे प्रवेश बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत होत असल्याचे जाहीर केले.

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक विजय शिंदे यांनी केले तर आभार विजय पवार यांनी मानले. कार्यक्रमात रवी माने, बाळकृष्ण काजारी, बबनराव शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.