डाॅ.संदीप डाकवे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना.
विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांना वाव द्यावा, कलेमुळे आपले जीवन समृध्द होते असे प्रतिपादन सुप्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी काढले ते मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये ‘लेखक तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने बोलत होते यावेळी व्यासपीठावर मदने जे.एस., डोंगरे एस.एल., उदुगडे पी.एस., कुंभार एस.डी., तिकुडवे के.आर., बाजीराव पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते.
डाॅ.संदीप डाकवे पुढे बोलताना म्हणाले, ‘‘लहानपणी जपलेल्या चित्रकला आणि लेखन छंदामुळे, आज माझी समाजात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. शालेय वयातच आपण आपले ध्येय निश्चित केले पाहिजे त्या ध्येयाच्या दृष्टीकोनातून आपण आपली वाटचाल करण्यासाठी योग्य मेहनत घेतली पाहिजे. आपण करत असलेल्या कोणत्याही कामामध्ये आपण आपले वेगळेपण जपले पाहिजे. गरजेपुरताच मोबाईलचा वापर केला पाहिजे. मोबाईलचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. ’’
या कार्यक्रमांचे प्रास्ताविक तसेच प्रमुख पाहुण्यांची ओळख संतोष कदम यांनी करुन दिली. यावेळी प्रमुख पाहुणे व मान्यवर यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. आभारप्रदर्शन श्री.जाधव ए.के. यांनी केले. या कार्यक्रमांसाठी सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व सर्व विदयार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी बनवलेले बुके देवून मान्यवरांचे स्वागत...
कार्यक्रमासाठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करण्यासाठी बुके देण्यात आला. विशेष म्हणजे हा बुके विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारातील फुले आणि पाने वापरुन केला होता. यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे दर्शन होते असे मत डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केले.
_______________________________