ढेबेवाडी ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीची बाजी.


नवनिर्वाचित सरपंच व सदस्याचे अभिनंदन करताना जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हिंदुराव पाटील (बापू) व युवा नेते अभिजित पाटील (दादा). 
ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या आणि प्रतिष्ठेच्या बनलेल्या व विभागातील राजकीय घडामोडीचे केंद्र असलेल्या ढेबेवाडी ग्रामपंचायतच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या श्री मरीआई देवी ग्राम विकास पॅनल ने दणदणीत विजय मिळवला.

या वेळी सरपंच पदासह 5 सदस्य पदाच्या जागेवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. सरपंच पदी सौ.रुपाली पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला तर सदस्य पदी श्री.सोमनाथ पाटील, अश्विनी मोहिते, मंगल कारंडे, अभिजित कडव, जास्मिन डांगे हे विजयी झाले. तर विरोधी पॅनलच्या देसाई समर्थक प्रसाद देवळेकर व अश्विनी रेडीज यांनी विजय संपादन केला. 

या वेळी महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचे  काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य श्री.हिंदुराव पाटील (बापू) व युवा नेते श्री.अभिजित पाटील (दादा) यांनी सदस्यांचे अभिनंदन केले.

या वेळी संजय पाटील,जमीर डांगे,आत्माराम कदम, विजय विगावे, सचिन वाघमारे, शांताराम पाटील, सतिश फल्ले, सुशांत चाळके, संतोष शेटे, गोविंद शेटे,व महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.