मान्याचीवाडी मंदिरात नामजप व भंडाऱ्याचे आयोजन

 


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी डोंगरावरची (गुढे) येथे श्री विठ्ठल रखुमाई भंडारा उत्सवानिमित्त नामजप यज्ञ सोहळयाचे नियोजन शुक्रवार दि.23 डिसेंबर, 2022 ते रविवार दि.25 डिसेंबर, 2022 अखेर करण्यात आले आहे. या सोहळ्याचे व्यासपीठचालक ह.भ.प. रामचंद्र महाराज शिद्रुक आहेत.

 शुक्रवार दि.23 डिसेंबर रोजी ह.भ.प. उदय मोरे साईकडे यांचे प्रवचन, ह.भ.प. विजय महाराज सपकाळ यांचे कीर्तन, शनिवार दि.24 डिसेंबर रोजी ह.भ.प. आराध्या अमोल कदम यांचे प्रवचन आणि ह.भ.प. निर्मला महादेव घारे यांचे कीर्तन, रविवार दि.25 डिसेंबर रोजी ह.भ.प.प्रा.डाॅ.प्रदीप यादव साईकडे यांचे प्रवचन आणि ह.भ.प.राजाराम महाराज माने यांचे कीर्तन यांचे कीर्तन होईल. याच दिवशी दुपारी 2 ते 5 विठ्ठल रखुमाई मंदिर ते मान्याचीवाडी मंदिर शिबेवाडी भव्य दिंडी सोहळा होणार आहे.

शनिवार दि.24 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 4 ते 6 वाजेपर्यंत हळदी कुंकू समारंभ होणार आहे.

याशिवाय दररोज सकाळी 4 ते 6 काकड आरती, सकाळी 7 वाजता विठ्ठल रखुमाई अभिषेक, सकाळी 9 ते 10 व दुपारी 3 ते 4 नामजप यज्ञ, सायंकाळी 4 ते 6 हरिपाठ, 6 ते 7 प्रवचन, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन व नंतर जागराचा कार्यक्रम होईल. दरम्यान गुढे, शिद्रुकवाडी, दळवीवाडी, वायचळवाडी, पाचुपतेवाडी, शिबेवाडी वरची व खालची, मान्याचीवाडी, दिंडेवाडी, मान्याचीवाडी, दिंडेवाडी, कुठरे पवारवाडी, कदमवाडी, मोरेवाडी, मोळावडेवाडी, जुळेवाडी, मान्याचीवाडी, मालदन, करपेवाडी, शिवसमर्थ भजनी मंडळ, तळमावले, शिबेवाडी-मान्याचीवाडी-कुंभारवाडी कुंभारगांव व पंचक्रोशीतील भजनी मंडळ साथ करतील.

तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक, ग्रामस्थ यांनी घ्यावा असे आवाहन ग्रामस्थ मंडळ मान्याचीवाडी, शिबेवाडी (गुढे), पाटीलवाडी (कुंभारगांव), विठ्ठल रखुमाई मंडळ मान्याचीवाडी गुढे यांनी केले आहे.