कुंभारगांव विभागातील चाळकेवाडी ग्रामपंचायतीत ना.शंभूराज देसाई गटाला सत्ता राखण्यात यश.

चंद्रकांत चाळके यांच्या नेतृत्वाखाली 6 उमेदवार बिनविरोध तर सरपंच पदी अशोक चाळके विजयी.विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना बाळासाहेब देसाई कारखान्याचे चेअरमन यशराज देसाई यावेळी माजी चेअरमन, विध्यमान संचालक डॉ दिलीपराव चव्हाण उपस्थित होते.

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील चाळकेवाडी ग्रामपंचायतीत उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला सत्ता राखण्यात यश आले आहे. 

कुंभारगांव विभागातील चाळकेवाडी येथील युवा नेते चंद्रकांत चाळके यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत निवडणूकीसाठी 6 सदस्य बिनविरोध झाले होते. तर सरपंच पदाचे उमेदवार अशोक चाळके यांनी या ठिकाणी दणदणीत विजय मिळवला आहे. या दरम्यान एक अर्ज बाद झाल्याने ती जागा रिक्त आहे.

सरपंच पदी अशोक चाळके विजयी तर सदस्य पदी अशोक चाळके, धनाजी चाळके, शारदा चोरगे, वनिता चाळके अलका चाळके व सुरेश भाऊ निवडुंगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

मतदारांना मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर आणण्यासाठी उमेदवारांनी विशेष यंत्रणा राबवली होती वृद्ध, अपंग, रुग्णांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही याची काळजी पॅनल प्रमुख कार्यकर्ते घेताना दिसून आले होते.

विजयी उमेदवार व बिनविरोध सदस्य यांनी चाळकेवाडी येथील मतदार यांना भेट देऊन आभार मानले व विजयी मिरवणूक काढत गुलालाची उधळण करीत विजय साजरा केला.