मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या माध्यमिक विदयालयात दहावीनंतर शैक्षणिक संधी याविषयी विदयार्थ्यासाठी एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी प्रमुख मार्गदर्शक श्री संतकृपा इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी (बी टेक)चे प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी हे उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ.स्वानंद कुलकर्णी म्हणाले की, विद्यार्थी मित्रहो आपले करिअर क्षेत्र निवडा,व्यवसायाभिमुख शिक्षण घेणे आज काळाची गरज आहे तसेच त्यांनी दहावीनंतर विविध शैक्षणिक संधी याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी श्री.चंद्रकांत चव्हाण, श्री.ए.के.जाधव सर यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.चव्हाण के.जे तसेच सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम सर यांनी केले तर आभार वरिष्ठ शिक्षक श्री.मदने जे.एस.सर यांनी मानले.