श्री सेवागिरी शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने युवा उद्योजक विजय काळे सन्मानीत.


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
प.पू.श्री.सेवागिरी महाराज देवस्थान ट्रस्ट पुसेगाव यांच्या वतीने आयोजित केलेले 75 वे राज्यस्तरीय सेवागिरी कृषी व पशुपक्षी प्रदर्शन यांच्यातर्फे जिल्ह्यातून देण्यात येणारा श्री सेवागिरी शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2022 हा पुरस्कार सेंद्रिय शेतीची चळवळ अधिकाधिक गतिमान होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत असलेले मालदन (ता. पाटण) गावचे युवा उद्योजक विजय पतंगराव काळे यांना देण्यात आला आहे.

विजय काळे यांनी बीएस्सी अॅग्रीची पदवी संपादन करून नोकरी न करता शेतीविषयक ज्ञानाचा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. विषमुक्त सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी गांडूळ खत, तसेच अन्य उत्पादनांचा निर्मिती उद्योग मालदनला सुरू करून ते यशस्वी उद्योजक बनले आहेत.

सेंद्रिय शेतीची मोठी चळवळ उभी राहिली आहे. उत्कृष्ट गांडूळखत प्रकल्प व कृषी क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कार्याची दखल घेत श्री सेवागिरी शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2022 देवून विजय यांना सन्मानीत केले. 

आ.शशिकांतजी शिंदे व कृषी विकास अधिकारी सातारा जिल्हा परिषद श्री विजय माईनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार विजय काळे यांना देण्यात आला. यावेळी कृषी विभाग महाराष्ट्र शासन, जिल्हा परिषद , पंचायत समिती येथील अधिकारी वर्ग व जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.