जन सहकार निधीच्या वतीने वाहन वितरण.

सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून संस्थेचा पारदर्शक कारभार सुरू : चेअरमन मारुतीराव मोळावडे



तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
ग्रामीण विभागात स्थापन झालेल्या जनसहकार निधी तळमावले या संस्थेने अनेक सभासदांना अर्थसहाय्य करून त्यांचे आर्थिक जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न केला आहे.
तळमावले, ता. पाटण येथील जनसहकार निधी या संस्थेच्या वतीने वाहन वितरण करण्यात आले.
संस्थेच्या वतीने शांताराम नलवडे यांना मारुती सुझुकी कंपनीच्या नवीन चारचाकी वाहनाचे वितरण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन मारुती मोळावडे, व्हा. चेअरमन अमोल मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. 
खा. श्रीनिवास पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसहकार निधी संस्थेची अल्पावधीतच घोडदौड सुरू आहे. सर्वसामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवून संस्थेचा पारदर्शक कारभार सुरू असल्याची माहिती चेअरमन मारुती मोळावडे यांनी यावेळी दिली. 
यावेळी संचालक मिलिंद ताईगडे, प्रशांत पोतदार, सुनील आडावकर, महेश कोकाटे, नितीन भोगे, सल्लागार उमेश काळे, जयवंत दिंडे, संजय पाटील, व्यापारी डॉ. संदीप मोहिते, नागेश शिद्रुक व कर्मचारी उपस्थित होते.