खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव यशवंत पुरस्कार जाहीर.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
विजय दिवस समारोह समितीतर्फे दिला जाणारा यंदाचा जीवनगौरव यशवंत पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. त्याच कार्यक्रमात ब्रिगेडियर जेम्स थॉमस, साताऱ्याचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. १५ डिसेंबरला मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण होईल, अशी माहिती विजय दिवस समारोह समितीचे सचिव अॅड. संभाजीराव मोहिते यांनी दिली.

कराड येथे ते पत्रकारांशी बोलत होते. समितीचे विनायक विभुते, सहसचीव विलासराव जाधव उपस्थित होते. अॅड. संभाजीराव मोहिते म्हणाले, कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा रौप्यमहोत्सव विजय दिवस साजरा होत आहे. विजय दिवस समीतीतर्फे दरवर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना जीवन गौरव यशवंत पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.आतापर्यंत ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील, संभाजीबाबा थोरात, माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले, नागनाथअण्णा नायकवडी, आचार्य शांताराम गरुड, भाई संपतराव पवार, अशोक गोडसे, क्रिकेटर चंदू बोर्डे, उद्योजक बाबासाहेब कल्याणी, भारती विद्यापीठाचे डॉ. शिवाजरीव कदम, जयसिंगराव पाटील-उंडाळकर, कृषितज्ज्ञ सदुभाऊ पाटील यांच्यासह मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहेत. 
यंदाचा पुरस्कार माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांना जाहीर झाला आहे. १५ डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन येथे पुरस्काराचे वितरण आणि ब्रिगेडीयर जेम्स थॉमस व पोलिस अधिक्षक समीर शेख यांचा विषेश पुरस्काराने सन्मान होईल. याच कार्यक्रमात वीर माता श्रीमती यशोदाबाई चव्हाण (तळबीड), आदर्श माता बाळुताई ढेबे (कापील), आदर्श विद्यार्थीनी अमृता पाटील (कराड) तर आदर्श विद्यार्थी सोहेल मुलाणी (कराड) यांनाही गौरवण्यात येईल. या कार्यक्रमास माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे उपस्थित राहणार आहेत.
______________________________
गौरव ग्रंथाचे होणार प्रकाशन...
१५ डिसेंबरला होणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात ज्यांच्यामुळे कराडमध्ये विजय दिवस साजरा होत आहे, ते विजय दिवस समारोहचे अध्यक्ष कर्नल संभाजीराव पाटील यांच्या जीवन कार्यावर आधारित ग्रंथाचे प्रकाशन होईल. त्यास माजी गृहमंत्री आमदार दिलीप वळसे-पाटील, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, लेफ्टनंट जनरल पी. जे. एस. पन्नु, प्रांताधिकारी उत्तमराव दिघे व मान्यवर उपस्थित राहतील.
_______________________________Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज