शरद पवार यांचे ‘पेपर कटींग आर्ट’ मधून डाॅ.संदीप डाकवेंनी साकारले पोट्रेट.

 तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पेपर कटींग आर्ट’ या कलेच्या माध्यमातून डाॅ.संदीप डाकवे यांनी अनोखे पोट्रेट तयार केले आहे. या पोट्रेटची साईज 12 बाय 18 इंच इतकी आहे. खा.पवार यांना चित्रातून पण वेगळया पध्दतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी डाॅ.डाकवे यांनी हे पोट्रेट केले आहे.गतवर्षी डाॅ.संदीप डाकवे यांनी शरद पवार यांना वाढदिनी 81 पोस्टकार्ड पाठवली होती. या उपक्रमाची दखल "वर्ल्ड ग्रेटेस्ट बुक ऑफ रेकॉर्ड" या पुस्तकाने घेतली होती. तर त्यापूर्वी स्क्रिबलिंग मधून पवार यांचे चित्र रेखाटले होते. याशिवाय कलेच्या उपक्रमातून गरजूंना लाखो रुपयांची आर्थिक मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे.

‘पेपर कटींग आर्ट’ मधून डाॅ.संदीप डाकवे यांनी शरद पवार यांच्या साकारलेल्या अनोखे पोट्रेट चे परिसरातून कौतुक होत आहे.

Popular posts
तळमावले येथील वाल्मिकी विद्यामंदिरात २५ वर्षानंतर भरला पुन्हा दहावीचा वर्ग
इमेज
कुंभारगांव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील चिमुरड्यांनी भरवला बाजार
इमेज
येळगाव येथे मोफत त्वचा रोग निदान व औषधोपचार शिबीर संपन्न.
इमेज
जनविकास पतसंस्थेच्या आगाशिवनगर शाखेचा चौथा वर्धापन दिन उत्साहात साजरा.
इमेज
माथाडी कामगारांचे अस्तित्व टिकविण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा : गुलाबराव जगताप
इमेज