आ.च. विद्यालयात वर्गसुशोभन व स्वयंशासन दिन उत्साहात साजरा.

कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे आ.च. विद्यालय व आदर्श ज्युनिअर कॉलेज मलकापूर येथे विद्यार्थ्यांना स्वयंशिस्तीचे महत्व व त्यांच्या कलागुणांना वाव देेण्यासाठी वर्गसूशोभन व स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला. या उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीतील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन स्वयंशासन दिन साजरा केला. 

या कार्यक्रमाचे प्रतिमापूजन व द्वीप प्रज्वलन श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सचिव, शेतीमित्र अशोकराव थोरात, संचालिका डॉ.सौ स्वाती थोरात,श्री मळाई देवी शिक्षण संस्था संचालक वसंतराव चव्हाण, केंद्रप्रमुख श्री हणमंतराव काटे,माजी मुख्याध्यापक श्री एस.वाय.गाडे, श्री सोपान जगताप ,सौ तबसूम सय्यद, सौ.ए.ए.शिर्के,कुमारी पाटील डी .पी. तसेच विद्यार्थी मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी बोलताना केंद्रप्रमुख हणमंंत काटे यांनी विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षणाचे व संस्काराचे महत्त्व सांगून स्वयंशस्तीचे महत्त्वही सांगितले. संस्थेचे सचिव श्री अशोकराव थोरात यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले सौ.. स्वाती थोरात यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. श्री वसंंत चव्हाण यांनी शैक्षणिक तक्ते वाचनाचे महत्त्व सांगितले. माजी मुख्याध्यापक एस.वाय. गाडे यांनी शिस्तीचे महत्व त्यात स्वयंशिस्तीला अधिक महत्व असल्याचे सांगितले. श्री.सोपान जगताप यांनी वर्ग सजावट व सुसंस्कार याचे महत्त्व सांगितले. स्वयंशासन दिनाचे मुख्याध्यापक ओंकार कोळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यार्थी दशेत प्रशासनाचा मिळालेला अनुभव भावी आयुष्यात उपयोगी पडेल. उपमुख्याध्यापक सोहम बोंद्रे, पर्यवेक्षिका संयुक्त शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.ए.एस. कुंभार,उपमुख्याध्यापक श्री ए बी थोरात,पर्यवेक्षक बी.जी. बुरुंगले तसेच स्वयंशासन दिनाचे प्रमुख श्री आर.आर.देसाई ,श्री.बी.जी. चौरे तसेच वर्गसुशोभनाचे प्रमुख सौ यु.ए.थोरात सौ.एस.बी.खाडे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. संयुक्त शिंदे हिने केले.सूत्रसंचालन वेदांग फुके याने केले. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार कु. स्वालिया मकानदार हिने मानले.