डाकेवाडी येथे गुरुचरित्र पारायण सोहळयाचे आयोजन


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथे सामुदायिक श्री गुरुचरित्र पारायण सोहळा व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. वै.ह.भ.प. यशवंत महाराज डाकेवाडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प.नामदेव महाराज डाकेवाडीकर हे व्यासपीठचालक चालक आहेत.

शनिवार दि.3 डिसेंबर, 2022 रोजी ह.भ.प. ज्योती लक्ष्मण डाकवे यांचे प्रवचन, ह.भ.प. सचिन महाराज डावरी यांचे कीर्तन, रविवार दि. 4 डिसेंबर, 2022 रोजी ह.भ.प. देवदत्त तुकाराम डाकवे यांचे प्रवचन आणि ह.भ.प. धोंडीराम महाराज सवादेकर यांचे कीर्तन, सोमवार दि. 5 डिसेंबर, 2022 रोजी ह.भ.प. वैष्णवी जगन्नाथ डाकवे यांचे प्रवचन आणि ह.भ.प.रामानंद महाराज दसूरकर यांचे कीर्तन, मंगळवार दि. 6 डिसेंबर, 2022 रोजी ह.भ.प. मिनाक्षी तुकाराम डाकवे यांचे प्रवचन आणि ह.भ.प.सुमित्राताई जाधव यांचे कीर्तन, बुधवार दि. 7 डिसेंबर, 2022 रोजी ह.भ.प.नाना महाराज केसरकर यांचे प्रवचन आणि ह.भ.प.सुभाष महाराज शिवाजीनगर यांचे कीर्तन होईल. गुरुवार दि.8 डिसेंबर, 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता ह.भ.प.सुभाष महाराज शिवाजीनगर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. तसेच बुधवार दि.7 डिसेंबर, 2022 रोजी दुपारी 3 ते 4 वाजेपर्यंत हळदी कुंकू समारंभ तर सायंकाळी 6.00 वाजता श्री गुरुदत्त जन्म उत्सवानिमित्त फुलांचा कार्यक्रम व रात्री 9 वाजता रात्री सावंतवाडी भजनी मंडळाचा जागराचा कार्यक्रम होणार आहे.

याशिवाय दररोज सकाळी 4 ते 6 काकड आरती, सकाळी 8 ते 11 व दुपारी 2 ते 5 गुरुचरित्र ग्रंथवाचन, सायंकाळी 5 ते 6 हरिपाठ, 6 ते 7 प्रवचन, रात्री 9 ते 11 हरिकीर्तन व नंतर जागराचा कार्यक्रम होईल.

आचरेवाडी, भरेवाडी, येळेवाडी, मस्करवाडी, मळाईचीवाडी, निवी, सलतेवाडी, डाकेवाडी (वाझोली) या व पंचक्रोशीतील भजनी मंडळे कीर्तनाला साथ करणार आहेत.

तरी या कार्यक्रमाचा लाभ परिसरातील भाविक, ग्रामस्थ यांनी घ्यावा असे आवाहन त्रिमुर्ती सार्वजनिक उत्सव मंडळ डाकेवाडी आणि समस्त ग्रामस्थ मंडळ डाकेवाडी (काळगांव) यांनी केले आहे.