कुंभारगांव विभागातील शेंडेवाडी ग्रामपंचायतीत पद्मावती ग्रामविकास पॅनेलचे सर्व 7 उमेदवार विजयी तर सरपंच पदी श्री जोतिबा ग्रामविकास पॅनेलच्या राहुल मोरे यांची बाजी.


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
 कुंभारगांव विभागातील शेंडेवाडी येथील पंचवार्षिक निवडणूक श्री जोतिबा ग्रामविकास पॅनल व पद्मावती ग्रामविकास पॅनल यांच्यात दुरंगी लढत झाली.
श्री जोतिबा ग्रामविकास पॅनेलच्या वतीने थेट सरपंच पदासाठी राहुल बाळकृष्ण मोरे तर पद्मावती ग्रामविकास पॅनेलच्या वतीने पॅनल प्रमुख सुभाष बाळासो मोरे निवडणूक रिंगणात उभे होते या दोन्ही पॅनेलच्या वतीने जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली होती.
राजकारणात अनुभवी असणारे सुभाष मोरे हेच निवडून येणार असे प्रथम दर्शिनी वातावरण होते. मात्र विरोधी पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार राहुल बाळकृष्ण मोरे विजयी ठरले.
या वेळी पद्मावती ग्रामविकास पॅनेलचे सर्व 7 उमेदवारानी दणदणीत विजय मिळवला. तर विरोधी श्री जोतिबा ग्रामविकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले.
विजयी पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष साजरा केला. पद्मावती ग्रामविकास पॅनेलचे सर्व उमेदवार निवडून आले परंतू पॅनेल प्रमुख व सरपंच पदाचे दावेदार सुभाष मोरे यांचा पराभव झाल्याने "गड आला पण सिंह गेला" अशी चर्चा सगळीकडे होत आहे.