श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले येथे 30 वर्षांनी फुलला सवंगड्यांचा मेळावा



तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
श्री वाल्मिकी विद्यामंदिर तळमावले येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून माजी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.

मुख्याध्यापक एस के. कुंभार ( माजी सहसचिव अर्थ. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर ) यांची 
एस एस सी बॅच 1991-92च्या विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यात प्रमुख उपस्थिती होती. तसेच श्री डी.बी. देसाई, श्री के.एम. पवार, श्री ए. वाय. दिंडे, श्री.बी. डी. कदम, श्री. कुलकर्णी, सौ.एस. एस. कुंभार इत्यादी तत्कालीन मुख्याध्यापक व शिक्षकवृंद ही उपस्थित होता.
        तब्बल 30 वर्षानंतर एकत्र जमलेले सर्व सवंगडी यांनी आपल्या जीवनातील आठवणींचा शब्द डोंगर उभा केला. आपल्या बालपणीच्या शालेय आठवणी मध्ये हे सर्व सवंगडी रमून गेले होते.
    कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री आनंद कोळेकर यांनी केले. तर मोहन भिंताडे, कृष्णा करपे,उज्वला माने, नंदा घोरपडे, संगीता करपे, व वैशाली पाटील यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
       प्रमुख अतिथी श्री. एस.के. कुंभार सर म्हणाले की, शालेय जीवनामध्ये झालेली विद्यार्थ्यांची जडणघडण ही महत्त्वाची असते तसेच सध्याच्या विद्यालयाच्या भौतिक सुधारणेबाबत आढावा मांडला. 
         सरांच्या या आवाहनास प्रतिसाद देत माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयास भरीव मदत देण्याचे आश्वासन दिले. सूर्यकांत तुकाराम कचरे, विभाग प्रमुख नवी मुंबई शहर (शिवसेना- बाळासाहेब ) यांनी विद्यालयाच्या भौतिक सुधारणा साठी 25,000 रुपये मदत देण्याचे घोषित केले. 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून त्यांनी ही मदत विद्यालयास सुपूर्द करण्याचे आश्वासन दिले.
      याप्रसंगी श्री रमेश साळुंखे, श्री सतीश कचरे, श्री संतोष गुजले, श्री महादेव पुजारी, श्री प्रकाश ढेब, सौ.सुवर्णा रजपूत, सौ.वनिता साळुंखे इत्यादी मान्यवरांनी आपल्या मनोगतामध्ये शालेय जीवनातील आठवणी बोलून दाखविल्या.
          या वेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माजी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती .
         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री आबा भिंगारदेवे व श्री. उत्तम शिंदे यांनी केले. सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार श्री. संजय बोत्रे यांनी मानले. या माजी विद्यार्थी मेळाव्या प्रसंगी पंचक्रोशीतील अनेक मान्यवर व माजी विद्यार्थी उपस्थित होते.