शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा : पालकमंत्री शंभूराज देसाई


सातारा दि. 24 : किल्ले प्रतापगड येथे बुधवार दि. 30 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा आहे. याचे सर्व विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केल्या. 

 कराड येथील शासकीय विश्रामगृहात शिवप्रताप दिन उत्साहात साजरा करण्याबाबत आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. 



 किल्ले प्रतापगडावर लेजर शो बरोबरच संपूर्ण गडावर विद्युत रोषाणई करावी, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, किल्ले प्रतापगडाची संपूर्ण स्वच्छता करावी. ऐतिहासिक मर्दानी खेळांचे, पोवाड्यांचे आयोजन करावे. त्याचबरोबर बाहेरुन येणाऱ्या पर्यटकांसाठी एस. टी. महामंडळाने बसेसची सोय करावी. तसचे पर्यटकांना जागोजागी शिवप्रताप दिनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी एलईडी स्क्रीनची व्यवस्था करावी. त्याच बरोबर येणाऱ्या पर्यटकांसाठी अल्पोपहाराचीही व्यवस्था करावी. यावर्षीचा शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करावयाचा असल्याने महाबळेश्वर व पाचगणी येथील शासकीय इमारतींवरही विद्युत रोषणाई करावी. शिवप्रताप दिनाचे नियोजन करत असतांना जिल्हा प्रशासनाने समन्वय साधून काम करावे अशा सूचनाही त्यांनी शेवटी केल्या.