मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी घोणशीची ऐश्वर्या गुरवची निवड.खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सत्कार.

   


      कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
घोणशी ता कराड येथील आनंदराव गुरव यांची कन्या ऐश्वर्या आनंदराव गुरव हिने कठोर परिश्रम आणी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर मंत्रालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी पदी मजल मारून महाराष्ट्र राज्यात यशाचा झेंडा फडवकला तिचे प्राथमिक शिक्षण घोणशी गावात झाले माध्यमिक शिक्षण अण्णाजी गोविंदराव पवार(सावरकर)विद्यालय येथे झाले तर महाविद्यालयीन शिक्षण S GM,कॉलेज कराड येथे झाले.तर अशोकराव माने ग्रुप ऑफ इस्न्टिट्यूट वाठार तर्फ वडगांव येथे इंजिनिअरिंग चे शिक्षण पूर्ण झाले. 

ऐश्वर्याचे अधिकारी होण्याचे स्वप्न होते. खडतर परिश्रम करून प्रचंड अभ्यास करून ऐश्वर्याने आई, वडील, मित्र मंडळी यांचे मार्गदर्शन मिळवत महाराष्ट्र राज्यातील लोकसेवा आयोगाच्या वतीने झालेल्या A,S,O, या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करून महाराष्ट्र राज्यातील मुलींमध्ये 3 रा क्रमांक मिळवून मंत्रालयात सहाय्यक कक्ष अधिकारी पदी निवड होण्याचा सन्मान मिळवला. 

या तिच्या उज्ज्वल यशाबद्दल सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी तिचे खास अभिनंदन केले. 

या यशा मध्ये आई, वडील, मित्र वर्ग यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे मत ऐश्वर्या गुरव हीने आपल्या निवडीनंतर व्यक्त केले.

ऐश्वर्या यांच्या यशा बद्दल मित्र मेत्रीणींनी गुलालाची उधळणं करत आन्दोत्सव साजरा केला ऐश्वर्याने मिळवलेले यश ग्रामीण भागातील विद्यालयातील विध्यार्त्याना प्रेरणादायी ठरणार असून तिचे सर्व थरातून या यशा बद्दल अभिनंदन व कौतुक होत आहे.