तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
विविध क्षेत्रात आदर्श असलेल्या आणि सामाजिक जडणघडणीसाठी उल्लेखनीय योगदान देत असलेल्या महिला आणि संस्था यांना पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील सांची फौंडेशन यांच्यावतीने राज्यस्तरीय "सांची-नारी रत्न पुरस्कार" देऊन गौरवण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी नामांकन पाठविण्याचे आवाहन सांची फौंडेशन चे संस्थापक डाॅ.संदीप डाकवे यांनी केले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत समाजासाठी अविरतपणे झटणाऱ्या सर्वसामान्यांमधील आदर्श महिलांना पुरस्काराने सन्मानित करुन त्यांचे कार्य समाजापुढे आणण्यासाठी सदर पुरस्कार देण्यात येणार आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांच्या मार्गदर्शनाखाली सांची फौंडेशन ने नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून आपल्या कामाची कर्तृत्वमुद्रा समाजमनावर उमटवली आहे.
पुरस्कारासाठी पात्र महिलांनी नामांकनासह आपल्या क्षेत्रातील केलेल्या कार्याचे फोटो, वृत्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे इ. साहित्य पाठवावे. आलेल्या नामांकनामधून निवड समितीने निवडलेल्या पुरस्कार्थींना एका भव्यदिव्य व शानदार कार्यक्रमात दिग्गज मान्यवर, सेलिब्रिटी यांच्या हस्ते पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येईल. शनिवार दि.31 डिसेंबर, 2022 पर्यंत ‘राजनंदा प्राईड अपार्टमेंट’, फ्लॅट नं.8, होली फॅमिली काॅन्व्हेंट स्कुलच्या पाठीमागे, सैदापूर विद्यानगर, ता.कराड, जि.सातारा. 415124 येथे पोस्टाने अथवा कुरियरने आपले नामांकन अर्ज सादर करावेत असे आवाहन अध्यक्षा सौ. रेश्मा डाकवे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी डाॅ.संदीप डाकवे मो.9764061633 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सांची फौंडेशन च्यावतीने प्रसिध्दीसाठी देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे.