महानायक अमिताभ बच्चन यांच्याकडून डाॅ.संदीप डाकवेंच्या चित्राची दखल



तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

बाॅलीवूडचे शहेनशाह, महानायक, स्टार ऑफ द मिलेनियम अर्थात ‘‘बिग बी’’ म्हणजेच अभिनेते अमिताभ बच्चन. अमिताभ यांचा नुकताच वाढदिवस संपन्न झाला या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी ठिपक्यातुन अमिताभ बच्चन यांचे रेखाटलेले चित्र पाठवले होते. त्या चित्राची दखल घेत अमिताभ यांनी स्वतः स्वाक्षरी करुन एक सुंदर पत्र डाॅ.डाकवे यांना पाठवले आहे. दस्तुरखुद्द अमिताभ यांनी पत्र पाठवल्यामुळे डाॅ.संदीप डाकवे अत्यंत खुष झाले आहेत. जागतिक कीर्तीच्या कलावंताकडून माझ्यासारख्या नवोदित कलावंताला दिलेली ही अनोखी शाबासकीची थाप असून यापुढे काम करण्यास अजून ऊर्जा मिळेल. आजच्या सोशल मिडीयाच्या आणि धकाधकीच्या जीवनात मला मिळालेले हे पत्र हा माझ्या पत्रमैत्री छंदातील दस्तऐवज ठरला असल्याची भावना डाॅ.संदीप डाकवे यांनी व्यक्त केली आहे.

सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबवत डाॅ.संदीप डाकवे यांनी राबवले आहेत.

डाॅ.संदीप डाकवे यांचेकडे छत्रपती संभाजीराजे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री ना.शंभूराज देसाई, माजी जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना.जयंत पाटील, माजी शिक्षण मंत्री ना.विनोद तावडे, माजी शिक्षण मंत्री ना.प्रा.वर्षाताई गायकवाड, श्रीमंत खा.उदयनराजे भोसले, खा.श्रीनिवास पाटील, खा.अरविंद सावंत, खा.अमोल कोल्हे, श्रीमंत छ.आ.शिवेंद्रसिंहराजे भोंसले, महंत आबानंदगिरीजी महाराज, अग्रलेखांचे बादशहा नीलकंठ खाडीलकर (भाऊ) पद्मश्री विजय शहा, उद्योजक विठ्ठल कामत, कवी इंद्रजित भालेराव, प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे, कलाशिक्षक बाळासाहेब कचरे, ग्लोबल गुरुजी रणजितसिंह डिसले, गिनीज बुक ऑफ होल्डर डाॅ.राजेंद्र कंटक, ग्रंथप्रसारक शरद जोशी, डी.एम.मेस्त्री, अक्षरमित्र ओंकार पाटील, नंदकुमार गायकवाड, प्रल्हाद कायंदे, मयुर दंतकाळे, श्रीराम मोहिते, पत्रमित्र संतोष शिंदे, इ.सह अनेक मान्यवरांची पत्रे असून या पत्रांमुळे त्यांचा पत्रसंग्रह दिवसेंदिवस समृध्द होत आहे.

विशेष म्हणजे डाॅ.संदीप डाकवे यांनी लिहलेल्या ‘‘वाचकांचा पत्रव्यवहार’’ या विविध वर्तमानपत्रातून प्रसिध्द झालेल्या पत्रांचे पुस्तक जागतिक टपालदिनी डाकघरात पोस्टमन काकांच्या हस्ते प्रकाशित झाले आहे. डाॅ.डाकवे यांच्या पत्रमैत्री छंदाची दखल घेत इलेक्ट्राॅनिक मिडीयावरुन विशेष रिपोर्ट प्रसिध्द करण्यात आल होता. आजच्या सोशल मिडीयाच्या युगात डाॅ.संदीप डाकवे यांनी जोपासलेला पत्रमैत्री छंद उल्लेखनीय आहे.