पाटण| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मुलींनी कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही संकटात स्वसंरक्षण करणे काळाची गरज आहे तरच आपण आपले संरक्षण करू शकतो असे प्रतिपादन निर्भया पथकाच्या पोलीस सौ. लोंढे मॅडम यांनी व्यक्त केले.
मोरणा शिक्षण संस्थेच्या शिवाजीराव देसाई विदयालय सोनवडे या विदयालयामध्ये "सातारा पॅटर्न" ना.शंभूराज देसाईसाहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर राबविणेबाबतचा असलेला मानस म्हणजे "निर्भया पथक"त्यांची कार्यशाळा विदयालयामध्ये पाटण पोलिस ठाणे यांच्या संयुक्त विदयमानाने आयोजित करण्यात आली होती. यावेळी विद्यालयातील विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
या कार्यशाळेसाठी पाटण पोलिस ठाण्यांचे सहाय्यक फौजदार श्री.कटरे,श्री.लादे यांनी विदयार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक श्री.संतोष कदम सर यांनी केले तर आभार श्री.जाधव ए.के.सर यांनी केले.
या कार्यशाळेसाठी मुख्याध्यापक श्री.के.जे.चव्हाण सर तसेच सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग,व विदयार्थी उपस्थित होते.