कराड येथे सहकारातील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन

 


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

      मळाई ग्रुप कराड व कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचार मंच यांचे संयुक्त विद्यमाने सहकार क्षेत्रातील आव्हानांवर चर्चा करण्यासाठी शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी सहकार परिषदेचे आयोजन कराड येथे केले आहे.

   सहकारातील वाढते खाजगीकरण, सहकाराची बदलती धोरणे, 97 वी घटना दुरुस्ती, केंद्र सरकारचे नवीन सहकार खाते, सहकाराची वर्तमानातील आव्हाने व सहकाराची बदलती अवस्था तसेच सहकारातील वाढती घराणेशाही, वाढता राजकीय हस्तक्षेप, व स्वार्थी वृत्ती याविषयावर परखड चर्चा करण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन मळाई ग्रुपचे अध्यक्ष शेतीमित्र अशोकराव थोरात यांचे पुढाकाराने आयोजित केलेली आहे. या परिषदेत सहकार क्षेत्रातील तज्ञ आणि अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.   

    शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी ठीक 10.00 वाजता येथील वेणुताई चव्हाण सभागृहात होणार्‍या सहकार परिषदेसाठी विनामूल्य नाव नोंदणी असून उपस्थितांना प्रमाणपत्र देणेत येणार आहे.

अधिक माहितीसाठी प्रा. आर डी पाटील 9922812132 प्रा. सतीश जंगम, 7588559898 यांचेशी संपर्क करून सहकार तज्ञ, शिक्षक, सहकार क्षेत्रातील अधिकारी व पदाधिकारी, संचालक, सभासद विद्यार्थी व सहकार प्रेमी यांनी परिषदेसाठी जास्तीत जास्त नाव नोंदणी करावी असे आयोजकांमार्फत आवाहन करण्यात आले आहे.