चेंबूरमधील घाटले ते आळंदी १८ पासून पायी दिंडी सोहळा

मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा:

जगभरातील कोरोना परिस्थितीमुळे उत्सव-सोहळे बंद होते.मात्र आता परिस्थिती निवळल्यामुळे दोन वर्षांंनंतर प्रथमच माऊली समाधी सोहळ्यानिमित्त चेंबूरमधील श्री विठ्ठल रखूमाई मंदिर, नागेश पाटील वाडी, घाटले गाव तेआळंदी पायी दिंडी यात्रा शुक्रवार १८ ते २२ नोव्हेंबरदरम्यान आयोजित करण्यात आली आहे. 

गेली २२ वर्षे हा पायी दिंडी सोहळा चेंबूरमधून प्रस्थान करून पाच मंदिरांना भेट देत सलग सात दिवस पायी चालत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष हभप धोंडीराम चिकणे महाराज यांच्या नेतृत्वाखाली आळंदी येथे दाखल होत आहे.तरी या पायी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी संस्थापक व अध्यक्ष हभप धोंडीराम चिकणे महाराज (९३०९५१०३३६) हभप दिगंबर शेलार, (९५९४२४९४९३) आणि हभप दिलीप कदम (९७६९३१४४१७) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.