पाटण तालुक्यातून भारत जोडो यात्रेत मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते जाणार ; जिल्हा कॉंग्रेसचे अभिजित पाटील यांची माहिती
ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेत सामील होण्यासाठी पाटण तालुक्यातून कार्यकर्त्यांची जोरदार तयारी सुरू असून तालुक्यातून पाच गाड्या जाणार असल्याची माहिती सातारा जिल्हा काँग्रेसचे अभिजित पाटील यांनी दिली आहे.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ८ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात नांदेड येथे दाखल होत आहे. या पार्श्वभूमीवर या यात्रेत सामील होण्यासाठी जाण्याचे नियोजन करण्यासाठी पाटण तालुका कॉंग्रेसच्या बैठकीचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य हिंदुराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाटण येथे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी या विषयावर चर्चा होऊन तालुक्यातील तारळे, चाफळ, कोयना, ढेबेवाडी, मल्हारपेठ विभागातून किमान प्रत्येकी एक गाड़ी निघणार हे नक्की झाले आहे. यंदा कडाक्याच्या थंडीला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी तयारीने येऊन भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करण्यापूर्वी नांदेड येथे सामील होऊन यात्रेबरोबर प्रवास करायचा आहे. असे नियोजन केल्याचेही अभिजित पाटील यांनी सांगितले.

 मेळाव्याला काँग्रेसचे प्रांतिक प्रतिनिधी हिंदुराव पाटील यांनी मार्गदर्शन केले. तालुकाध्यक्ष पांडुरंग यादव तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉ. संतोष कदम, युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नरेंद्र पाटणकर, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, पाटण तालुका काँग्रेसचे सरचिटणीस सतीश काळे, विलास सपकाळ, तालुका काँग्रेसचे खजिनदार नारायण चव्हाण, विष्णू सपकाळ, राजन भिसे, आनंदराव नांगरे, आर. बी पाटील, संजय पाटील, तुकाराम पाटील, दादासो साळुंखे, पाटण तालुका महिला कॉंग्रेसच्या खजिनदार: अनिता घाडगे, विजय घाडगे, अरविंद घाडगे, भूषण पाडगे, दर्शन कवर यांसह कार्यकत्यांची मोठी उपस्थिती होती.