स्व.अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र सरकारकडून स्थापन केलेला कायदा देशातील संपुर्ण राज्यांना लागू व्हावा:नरेंद्र पाटील

 


नवीमुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा : कष्टकरी कामगारांसाठी स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी महाराष्ट्र सरकारकडून स्थापन केलेला कायदा देशातील संपुर्ण राज्यांना लागू झाला पाहिजे, त्याकरीतां आणि व्यापारी- उद्योजक व कष्टकरी माथाडी कामगारांचे न्याय्य प्रश्न सोडविण्यासाठी केंद्रातील नेत्यांना मेळाव्यास महाराष्ट्रात बोलाविले पाहिजे, असे उद्गार अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) व महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी काढले,

माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची महाराष्ट्र शासनाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) पदी नेमणुक झाल्याबद्दल मंगळवार दि.८ नोव्हेंबर रोजी नवीमुंबईतील एपीएमसी दाणाबंदर मार्केटमधील कै. आमदार अण्णासाहेब पाटील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तसेच या मार्केट आवारातील तमाम माथाडी, वारणार, पालावाला महिला कामगार, ग्रोमा व ट्रान्सपोर्ट असोसिएशन, व्यापारी वर्ग व अन्य घटकांच्यावतिने सत्कार समारंभ आयोजित करून सत्कार करण्यात आला.

नरेंद्र पाटील पुढे म्हणाले की, माथाडी कामगार हा माझा केंद्रबिंदू आहे, स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांनी स्थापन केलेली ऐतिहासिक माथाडी कामगार चळवळ आणि मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याचे कार्य मी करीत आहे, दाणाबंदर मार्केटमधील सर्व घटकांनी माझा सत्कार केला, माझी जबाबदारी वाढलेली आहे, माथाडी कामगारांना न्याय देण्याबरोबर महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देवून मराठा युवकांना उद्योजक करण्याचा प्रयत्न मी सतत करणार आहे.

यावेळी युनियनचे जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख तसेच ग्रोमाचे शरद मारु, कार्यकर्ते सर्वश्री नाना धोंडे, पांडुरंग धोंडे, प्रकाश धोंडे, अजय इंगुळकर आदींची भाषणे झाली.

सत्कार समारंभाचे सूत्रसंचालन सेक्रेटरी अशोक दुधाणे यांनी केले. या सत्कार समारंभाच्या व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे अध्यक्ष एकनाथ जाधव, संयुक्त सरचिटणीस रविकांत पाटील, दिलीप खोंड, ग्रोमाचे शरद मारु, महेंद्रभाई गजरा, महेंद्रभाई सोनी, गांगजीभाई, हंसराजभाई, रिटेल ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे शिवाजी बो-हाडे, विजय बो-हाडे, अब्दुलभाई, एमआरटीचे संतोष मालूसरे, प्रकाश चिकणे, युनियनचे सेक्रेटरी विश्वास पाटील, कृष्णा पाटील, प्रशांत सणस, गणेशोत्सव मंडळाचे सुरेश देवघरे कार्यकर्ते सर्वश्री बाजीराव धोंडे, विष्णू खाटपे, बाळू चिकणे, पांडुरंग साळेकर, पोपट पवार, दिनकर सनुगले, जितू येवले आदी उपस्थित होते, दाणाबंदर मार्केटमधील कै. अण्णासाहेब पाटील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व मार्केट आवारातील सर्व घटकांच्यावतिने नवनिर्वाचित अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) यांची मार्केट आवाराच्या गेटवरुन भव्य मिरवणुक काढण्यात आली. 

यावेळी तमाम माथाडी, वारणार कामगार, कार्यकर्ते पालावाला महिला, व्यापारी वर्ग व दाणाबंदर मार्केट आवारातील घटक उपस्थित होते.