'नवभारत' पतसंस्थेचा १७वा वर्धापनदिन उत्साहात साजरा


तळमावले: वेदिका माटेकर हिचा सत्कार करताना पतसंस्थेचे संस्थापक संजय देसाई व इतर मान्यवर.
तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा : 
नवभारत ग्रामीण बिगरशेती पतसंस्था, तळमावले या शाखेचा १७ वा वर्धापन उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय देसाई, चेअरमन सौरभ देसाई, व्हा. चेअरमन महेश ताईगडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, विविध शाखेचे शाखा प्रमुख यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

तळमावले व परिसरातील सर्व व्यापारी, शेतकरी यांनी एकत्र येऊन 'एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ' यावर विश्वास ठेऊन या संस्थेची सुरुवात केली. आज १७ वर्षांत सर्व सामान्यांना आर्थिक मदतीने उभे करण्यासाठी संस्था कार्य करीत आहे. आर्थिक क्षेत्रात काम करताना सामाजिक 'भान व जबाबदारी लक्षात घेऊन या वर्धापन दिनाच्या औचित्याने शैक्षणिक क्षेत्रात प्रावीण्य प्राप्त केलेली कु. वेदिका दादासो माटेकर हिने NEET परीक्षा उत्तीर्ण होऊन MBBS ला महाराष्ट्र शासनाच्या महाविद्यालयात प्रवेश मिळाल्याबद्दल तिचा शाल, श्रीफळ, शिल्ड देऊन सत्कार केला. तसेच देशसेवा करून सेवानिवृत्त झालेले श्री सुरेश पाटील गुढे यांचा देखील सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या तज्ञ संचालक पदी श्री सुहास पाटील सुपने यांच्या निवडीचे पत्र देऊन त्यांचा देखील सत्कार करण्यात आला.

 दरम्यान, संचालक मंडळ, सभासद हितचिंतक, कर्मचारी, प्रतिनिधी यांचे अभिनंदन करून संस्थेच्या वाढीस शुभेच्छा दिल्या. संस्थेचे संस्थापक/संचालक संजय देसाई प्रास्तविकात म्हणाले, महाराष्ट्रात सहकार क्षेत्रामध्ये विशेषतः पतसंस्थांमध्ये आर्थिक पायावर स्वावलंबी असलेली एक आदर्श पतसंस्था म्हणून नवभारत संस्थेचे नाव घेतले जाते. नवभारत ग्रामीण बिगर शेती पतसंस्था प्रभावी जनसंपर्क, रचनात्मक निर्णय घेण्याची क्षमता आहे. 

या कार्यक्रमासाठी दिवसभर शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सहकार, कृषी, पत्रकार बंधु व व्यापारी वर्ग इ. क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे संचालक राजाराम शिबे, तुषार चाळके, रविंद्र बुरसे, उमेश शेलार, विशाल शिबे, रामचंद्र सुर्वे, रामचंद्र झोरे, महादेव वरेकर, रमेश गुरव, सुहास पाटील, दादासाहेब शेडगे गुरुजी, शारदा पुजारी, सुवर्णा खटावकर, अपेक्षा कांबळे, साधना मस्कर, तसेच संस्थेचे सर्व सल्लागार, सर्व पदाधिकारी, कर्मचारी वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सचिन पुजारी यांनी केले. आभार अमोल माने यांनी मानले.