जवाहरलाल नेहरु यांची अशी ही कलाकृती


 


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

नेहरु आणि लहान मुले हे नाते लक्षात घेवून पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील विश्वविक्रमवीर कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी लहान मुलांच्या चेहऱ्यांमधून पंडित नेहरुंचे अप्रतिम रेखाचित्र तयार केले आहे. डाॅ.डाकवे यांनी आतापर्यंत विविध शब्दातून चित्रे साकारली आहेत. परंतू लहान मुलांच्या चेहऱ्यांमधून साकरलेले हे पहिलेच चित्र आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांचा जन्म 14 नोव्हेंबर, 1889 रोजी प्रयागराज येथे झाला. ते सर्वांचेच ‘‘लाडके चाचा’’ होते. त्यांना लहान मुलांचा अतिषय लळा होता. मुलांवर योग्य संस्कार व्हावेत यासाठी ते नेहमी आग्रही असत. ‘‘मुलं म्हणजे देवाघरची फुलं’’ असे ते नेहमी म्हणत मुलांवरील अपार प्रेमापोटी त्यांची जयंती ‘‘बालदिन’’ म्हणून साजरी केली जाते.