चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड.


नवी मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण तालुक्यातील कुंभारगाव विभागातील चाळकेवाडी गावचे सुपुत्र व साईराज कॉ.ऑप. क्रेडिट सोसायटी मुंबईचे चेअरमन चंद्रकांत चाळके यांची बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी निवड झाली आहे.

नवी मुंबईचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी निवड पत्र देऊन त्यांचे अभिनंदन केले. चंद्रकांत चाळके यांची राज्य उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळख आहे.

त्यांनी अनेक वर्ष मुंबई व कुंभारगाव विभागात शिवसेनेसाठी काम केले आहे. त्याच बरोबर सहकार, शिक्षण, क्रीडा, आरोग्य इ.क्षेत्रात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. ‘‘घार उडते आकाशी, परंतू तिचे लक्ष पिलापाशी’’ या उक्तीप्रमाणे त्यांचे कार्यक्षेत्र मुंबई असले तरी त्यांना आपल्या मातीची ओढ गप्प बसू देत नाही. गावीदेखील ते गावाच्या विकासासाठी तसेच विभागातील जनतेच्या विविध प्रश्नासाठी सदैव प्रयत्नशील असतात विविध सामाजिक उपक्रमात ते नेहमी अग्रभागी असतात.ते उत्तम संघटन कौशल्य असणारे युवा नेतृत्व आहे त्यामुळे त्यांच्याकडे मोठा मित्रपरिवार आहे. मोठा युवक वर्ग त्यांच्या पाठीशी आहे. ना. शंभूराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली विविध विकास कामे त्यांनी कुंभारगाव विभागात आणली आहेत.



साईराज परिवारातर्फे विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवले जातात. या त्यांच्या सामाजिक कार्याची नोंद घेऊन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले,व पदाधिकारी यांनी बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या ऐरोली विधानसभा विभाग प्रमुख पदी त्यांची अभिनंदनीय निवड केली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. कुंभारगाव व काळगाव विभागातील कार्यकर्त्यांनी व नवी मुंबईतील तमाम युवकांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.

या निवडीनंतर दैनिक कृष्णाकाठशी बोलताना चंद्रकांत चाळके म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले व बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते, उपनेते व पदाधिकारी यांनी मला या पदावर काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. मला दिलेल्या संधीचा मी समाजाच्या सेवेसाठी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी व पक्ष वाढीसाठी प्रामाणिक प्रयत्न करीन अशीही ग्वाही त्यांनी शेवटी बोलताना व्यक्त केली.

त्यांच्या निवडीमुळे नवी मुंबई व कुंभारगाव विभागातील युवा वर्गामध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे.