कराड येथील नवीन शासकीय विश्रामगृहाचे व प्रशासकीय इमारतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन.


कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:   

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरात मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची उभारणी केली होती तसेच नवीन शासकीय विश्रामगृह सुद्धा उभारले होते या दोन्ही इमारती पूर्ण होऊनही उदघाट्न च्या प्रतीक्षेत होत्या. या इमारतींचे उदघाट्न आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती तर मंत्री उदय सामंत यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी रयत सह साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय मुंगीलवार, कराड दक्षिण काँग्रेस अध्यक्ष मनोहर शिंदे, माजी नगरसेवक राजेंद्र माने, इंद्रजित गुजर, झाकीर पठाण, प्रदीप जाधव, अशोक पाटील, निवास थोरात, इंद्रजीत चव्हाण यांच्यासह प्रांतधिकारी, तहसीलदार आदिसह प्रमुख मान्यवर व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना कराड जिल्हा व्हावा या उद्देशाने कराड शहरात रचनात्मक विकास केला व भरघोस निधी आणला. त्यानुसार विविध ठिकाणी असलेली शासकीय कार्यालये एकाच इमारतीत आणण्यासाठी मध्यवर्ती प्रशासकीय इमारत मंजूर केली या इमारतीसाठी 17 कोटी रुपयांचा निधी आ. चव्हाण यांनी मंजूर केला होता त्यानुसार हि इमारत पूर्ण झाली आहे. तसेच कराड हि राजकीय सांस्कृतिक घडामोडी असणारे शहर असल्याने या ठिकाणी विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्ती येत जात असतात. तसेच राजकीय नेत्यांचे सुद्धा येणे जाणे असते या सर्वांच्या सोयीसाठी कराड शहरात सुसज्ज विश्रामगृह असावे या हेतूने आ. चव्हाण यांनी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात 25 कोटी रु इतका निधी मंजूर करून शहरात सुसज्ज असे शासकीय विश्रामगृह उभारले आहे. या दोन्ही वास्तू कराड शहराच्या शोभा वाढविणाऱ्या आहेत व म्हणूनच या इमारती जनतेसाठी उपलब्ध व्हाव्यात यामुळे उदघाट्न अभावी वापरात नसलेल्या इमारतींचे उदघाट्न होणे गरजेचे होते म्हणूनच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली या दोन्ही इमारतींचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.