पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सातारा जिल्हा परिषद सातारा शिक्षण विभाग व सातारा जिल्हा क्रीडा विभाग सातारा यांचे संयुक्त विदयमानाने पाटण तालुका शासकीय शालेय खो-खो स्पर्धेचे आयोजन दि:30 नोंव्हेबर व दि :1 डिसेंबर या कालावधीत मोरणा शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ-धावडे या विदयालयामध्ये संपन्न होणार आहेत,
या खो-खो स्पर्धेचे उद्घाटन मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री.रविराज देसाई,सचिव श्री.डी.एम.शेजवळ लोकनेते बाळासाहेब देसाई फौंडेशनचे सचिव व माजी पंचायत समिती सदस्य श्री.एन.एस.कुंभार सर,विदयालयाचे मुख्याध्यापक श्री.केंडे पी.एल.सर, महाराष्ट्र राज्य क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष श्री.मनोहर यादव सर,पाटण तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष श्री.आर.डी.देसाई सर,उपाध्यक्ष श्री.शिरीष पाटील सर,सचिव श्री.रमेश लोंढे सर,तालुका समन्वयक प्रा.श्री.दिनेश रेवडे सर,तसेच महाराष्ट्र क्रीडा असोशिएशन,व जिल्हा क्रीडा असोशिएशनचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून या स्पर्धेसाठी पाटण तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयातील 14 वर्षाखालील व 19 वर्षाखालील पात्र मुले-मुली यांचे खो-खो चे सामने होणार आहेत,अशी माहिती न्यू इंग्लिश स्कूल गोकूळ -धावडे या विदयालयाचे क्रीडा शिक्षक व आयोजक श्री.वैभव घोणे सर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.