श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा धार्मिक व सामाजिक उपक्रमाने उत्साहात संपन्न.

तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

मोरेवाडी (चिखलेवाडी) ता.पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिराचा जिर्णोद्धार व १५ व्या वर्धापन दिनानिमित्त जनसेवा तरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळ मोरेवाडी यांनी आयोजित केलेल्या समारंभासाठी 101 पौराहित्य (जंगम ) यांचे प्रमुख उपस्थितीत श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी देवीस महारुद्र अभिषेक शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात आला.

या वेळी येथील तरुण मंडळाने समाजाची आरोग्याची काळजी घेऊन रुग्णांना होणारा अपुरा रक्तपुरवठा लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी भव्य रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 







मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न.

आरोग्य तपासणी शिबिर तळमावले प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ गोंजारी व डॉ.पवार यांचे मार्गदर्शनाखाली कुंभारगांव उपकेंद्राचे डॉ सुप्रिया यादव, सोनाली परीट, आरोग्य सेवक रोहित भोकरे यांचेकडून बीपी, शुगर, वजन इत्यादी तपासणी करण्यात आल्या.

 तर रक्तदान शिबिरासाठी एम, डी, (पॅथॉलॉजी ), दत्त पॅथॉलाजी प्रयोगशाळा आणी संशोधन केंद्र,कराड चे डॉ.मिलिंद पवार, डॉ.माहेश्वरी पवार, डॉ.अनंत घारे, डॉ.अदिती घारे यांचे सहकार्याने या वेळी रक्तदान शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यात आले. या वेळी 73 रक्त दात्यांनी रक्त दान केले होते.


सदर कार्यक्रमात रक्तदाते रक्तदान करताना.

या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व ग्रामस्थ, भक्तगण यांच्यासाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.महाप्रसादाचा लाभ घेण्या साठी यावेळी भाविकभक्त, ग्रामस्थ यांनी अलोट गर्दी केली होती.      

सदर कार्यक्रमासाठी श्री,व,ष,प्र, 108 पदमभास्कर डॉ.निळकंठ शिवाचार्य महास्वामी, धारेश्वर महाराज तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर ता पाटण व श्री दयानंद गिरी महाराज अमरनाथ मठ, गगनगिरी मठ धारेश्वर दिवशी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

यावेळी सर्व भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी मंदिर परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.   

सदर कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ.नीलकंठ शिवाचार्य महास्वामी धारेश्वर यांचे प्रवचनाचे आयोजनही करण्यात आले होते.







सदर कार्यक्रम प्रसंगी खासदार श्रीनिवासजी पाटील मार्गदर्शन करताना.

या धार्मिक समारंभासाठी सातारा जिल्ह्याचे खासदार श्रीनिवासजी पाटील, सातारा जिल्हा बँक संचालक सत्यजितसिंह पाटणकर, पाटण पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश मोरे, राजे संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक योगेश पाटणकर, कुंभारगांव ग्रामपंचायत सरपंच सौ.सारिका पाटणकर, रयत सह साखर कारखाना संचालक प्रशांत पाटील, सातारा जि. सह बोर्डाचे संचालक विकास पवार, चिखलेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच परिसरातील ग्रामस्थ, भाविक भक्त बहुसंख्येने उपस्थित होते.

यावेळी जनतेसाठी ई कार्ड व अबा कार्ड काढून देण्याची सुविधा या वेळी करण्यात आली होती या साठी दिपाली चाळके यांनी सहकार्य केले. 

 सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनसेवा तरुण मंडळ व ग्रामस्थ तसेच सर्व गणेश, युवा मंडळे,रामचंद्र स्वामी यांनी विशेष परिश्रम घेतले.