मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते कराडमध्ये विविध विकासकामांची भूमिपूजन व उदघाट्न.

उद्या 25 नोव्हेंबर रोजी होणार उदघाटन कार्यक्रम.मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, नवीन शासकीय विश्रामगृह यांचे उदघाट्न तसेच कृष्णा नदीवरील रेठरे व पाचवडेश्वर-कोडोली नवीन पुलाचे भूमिपूजन.कराड| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
उद्या 25 नोव्हेंबर रोजी कराड दक्षिण मधील विविध विकासकामांचा शुभारंभ तसेच भूमिपूजन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकना शिंदे हे उपस्थित राहणार असून त्यांचे हस्ते प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालयाचा लोकार्पण तसेच शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन व कृष्णा नदीवरील रेठरे व पाचवडेश्वर-कोडोली नवीन पुलाचे भूमिपूजन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिण मध्ये विविध विकास कामे झाली आहेत. मुख्यमंत्री असतानाच्या काळात व त्यानंतरही या विकास कामांची कार्यवाही व इतर कामे सुरू आहेत. आमदार चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड शहरात भव्य प्रशासकीय मध्यवर्ती कार्यालय बांधण्यात आले. या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा तसेच नवीन विश्रामगृहाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. तसेच रेठरे येथिल नवीन पुलाचे भूमिपूजन व पाचवडेश्वर कोडोली दरम्यान होणाऱ्या नवीन पुलाचे भूमिपूजन ही मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथी निमित्त समाधी स्थळावर श्रद्धांजली कार्यक्रम तसेच राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वरील या चार कामांचा शुभारंभ व भूमिपूजन करण्यात येणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.