घोगाव तलावावर स्थलांतरित पक्षी निळकंठ याचे आगमन.पक्षी निरीक्षकांना एक पर्वणी.


उंडाळे|कृष्णाकाठ वृत्तसेवा:                    
हिवाळ्याची चाहूल लागताच येथील तलावावर स्थलांतरित पक्षी निळकंठ याचे आगमन झाले असून याच्या सह अन्य विविध पक्षांचे आगमन तलाव परिसरात झाल्याने पक्षी निरीक्षकांना एक पर्वणीच लाभत आहे.                                       

ज्येष्ठ पक्षी तज्ञ डाॅ.सलीम अली व मारुती चितमपल्ली यांच्या जन्मदिनानिमित्त पाच नोव्हेंबर ते बारा नोव्हेंबर या कालावधीत पक्षी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. येथील स्वातंत्र्यवीर दादासाहेब उंडाळकर विद्यालयातील हरीत सेनेचे विद्यार्थी व पर्यावरण तज्ञ, पक्षी निरीक्षक प्रा.डाॅ. सुधीर कुंभार, प्राचार्य बी. आर. पाटील, पर्यवेक्षक जे. एस. माळी यांच्या मार्गदर्शनाने विद्यालयातील शिक्षक धनंजय पवार, शंकर आंबवडे सौ. अंजली देशमुख यांनी सुमारे 100 विद्यार्थ्यांना उंडाळे च्या पश्चिमेला कराड- रत्नागिरी रोड लगत निसर्ग सौंदर्याने नटलेला तलाव परिसरात येथे पक्षी निरीक्षण कार्यक्रम आयोजित केला.  

पक्षी निरीक्षण करत असताना हिवाळ्यामध्ये स्थलांतर झालेल्या निळकंठ याने विद्यार्थ्यांचे लक्ष वेधले. युरोप खंडातून पिवळा धोबी, पांढरा धोबी, तुतवारा याशिवाय कवड्या धिवर, पांढऱ्या मानेचा करकोचा, कोतवाल, राखी बगळा, डारटर, हळदीकुंकू बदक, नदी सुरय्या कारण कारमोनंट, मैना, नाचरा, साळुंकी,डोम कावळा,पाणकावळा असे विविध पक्षी पाहण्याची मौज विद्यार्थ्यांनी लुटली. पक्षी निरीक्षण करताना काही पक्षांचे विविध हालचाली क्षण विद्यार्थ्यांनी कॅमेऱ्यामध्ये टिपली. या पक्षी निरीक्षणातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे असणारे पक्षी त्यांचे असणारे खाद्य, अधिवास व घरट्यांचे प्रकार तसेच याबरोबर हे पक्षी कुठून स्थलांतर झाले याविषयीची माहिती पक्षी निरीक्षक प्रा.डाॅ. सुधीर कुंभार यांनी विद्यार्थ्यांना दिली. याप्रसंगी विद्यार्थ्यांकडून पक्षी निरीक्षण तक्ता भरून घेत 

अधिक माहीती पक्षीमित्र सुहास पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिली. यावेळी रोहित गाडे सर, अनिल लोंढे सर उपस्थित होते. निसर्ग, पर्यावरण व विज्ञान या विषयाची विद्यार्थ्यांना गोडी निर्माण व्हावी व विद्यार्थी निसर्ग पर्यावरण रक्षण बनून याबाबत संवेदनशील असावा म्हणून आयोजित केलेल्या या उपक्रमाचे परिसरात पालकांकडून कौतुक होत आहे.