मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराडमधील स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराडमधील शंभुतीर्थ येथे उभारण्यात येणाऱ्या स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीनिवास पाटील,खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार महेश शिंदे, आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, स्वराज्य रक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील, सचिव रणजित पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्मारक समितीचे अध्यक्ष जयंतकाका पाटील यांनी स्वागत केले.

कराड नगर परिषद हद्दीत स्वराज्यरक्षक श्रीमंत छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणी व अनुषंगिक कामाकरिता कराड नगर परिषदेला ८ आठ कोटी रुपये वितरीत करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. प्रकल्प खर्चाच्या ९० टक्के हिस्सा राज्य शासनाचा व १० टक्के हिस्सा नगर परिषदेचा राहणार आहे.