राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्यावतीने कोल्हापुरात घटना बचाव परिषद


 राष्ट्रीय अध्यक्ष भारत वाघमारेंची मुंबईत घोषणा 

मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा:  

सध्या राजकिय अस्थिरता लक्षात घेता भारतीय घटना करण्याचे काम सुरू असल्याचे दिसून येते.तरी ही घटना टिकवणे लोकशाही मानणार्‍या सर्वांची महत्वाची जबाबदारी आहे.त्यामुळेच आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोल्हापूर शहरातील दसरा चौकात येत्या रविवार २० नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष, शिवशक्ती- भीमशक्तीच्यावतीने घटना बचाव परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. 

राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष भारत वाघमारे यांनी या घटना बचाव परिषदेची मुंबई मराठी पत्रकार संघात नुकतीच घोषणा केली.

यावेळी महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश वाडेकर तसेच शामराव बनसोडे,शशिकांत हिरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणखी महिला पत्रकारांस अपमानित करणारे संभाजी भिडे यांचा जाहीर निषेध करण्यात आला.दरम्यान, अशा घटना बचाव परिषदा सर्व जिल्ह्यात आणि प्रमुख शहरांमध्ये घेण्यात येणार आहेत असे यावेळी वाघमारे यांनी सांगितले.