लक्ष्मी किसान नागरी पतसंस्थेच्या वतीने कु वेदश्री माटेकर हिचा गौरव.


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

 कुंभारगांव ता पाटण येथील लक्ष्मी किसान नागरी पतसंस्थेच्या वतीने कु वेदश्री दादासाहेब माटेकर हिने वैद्यकीय नीट परीक्षेत 581 गुण मिळवून यश संपादन केले त्यामुळे तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगाई मध्ये M,B,B,S,च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला.   

 कु वेदश्री दादासाहेब माटेकर कुंभारगांवच्या माटेकरवाडी येथील सामान्य शेतकरी कुटूंबातील. जिद्द चिकाटी प्रचंड आत्मविश्वास व प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर व अभ्यासातील खडतर परिश्रमाने नीट परीक्षेत 581 गुण मिळवून भरघोस यश संपादन केले. तिच्या या यशाचे कौतुक व भविष्यातील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रेरणा मिळावी या हेतूने लक्ष्मी किसान नागरी पतसंस्थेचे मार्गदर्शक आनंदराव हिंदुराव चव्हाण, चेअरमन दिपकराव चव्हाण, पाटण राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष राजेंद्र आनंदराव देसाई यांनी संस्थेच्या वतीने या यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करून गौरव केला.

 मान्यवरांच्या हस्ते तिचा शाल, श्रीफळ व श्री गणेशाची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी राजेंद्र देसाई त्यांनी उपस्थितांना  मार्गदर्शन केले व कु वेदश्रीला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.  

 या वेळी संस्थेचे मार्गदर्शक आनंदराव चव्हाण, चेअरमन दिपकराव चव्हाण, कुंभारगांव वि, का.स. सेवा सोसायटीचे संचालक जगन्नाथ देसाई, विजय पाटील, शरद घाडगे,सुरेश चव्हाण, मंदाकिनी थोरात, प्रकाश वरेकर, अनिल वरेकर, छाया ताईगडे, कु वेदश्रीचे आई वडील उपस्थित होते.