सुरेश डूबल यांची पाटण तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड

 

तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
खळे काजारवाडी तालुका पाटण  गावचे सुपुत्र, हनुमान विकास सोसायटी काजारवाडीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सुरेश डूबल यांची पाटण तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे.

सत्यजितसिंह पाटणकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम केले आहे.

यापूर्वी त्यांनी 5 वर्ष हनुमान विकास सोसायटी काजारवाडीचे चेअरमन म्हणून काम पाहिले होते. आता ते विद्यमान संचालक म्हणून काम पाहत आहेत.

त्यांच्या कामाची सत्यजितसिंह पाटणकर यांनी दखल घेवून पाटण तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक पदी त्यांना संधी देण्यात आली. त्यांच्या या निवडीबद्दल विविध स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. खळे,काजारवाडी, डूबलवाडी,शिद्रुकवाडी येथील कार्यकर्त्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले.