मोरेवाडी ता पाटण येथील श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार व 15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन.

 


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

श्री सिद्धनाथ व माता जोगेश्वरी मंदिर जीर्णोद्धार  15 व्या वर्धापन वर्षारंभ निमित्त जनसेवा तरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळ मोरेवाडी ता पाटण यांचे कडून आयोजित भव्य रक्त दान शिबीर व 101 पौराहित (जंगम )यांचे उपस्थितीत महारुद्र अभिषेक आदी विविध धार्मिक कार्यक्रम मंगळवार दि 22/11/2022 रोजी सकाळी 9 वा आयोजित केले असून या वेळी प्रमुख उपस्थित श्री, व, ष,, प्र, 108 पदमभास्कर डॉ, निळकंठ शिवाचार्य महास्वामी, धारेश्वर महाराज तीर्थक्षेत्र आदिमठ संस्थान धारेश्वर ता पाटण व श्री दयानंद गिरी महाराज अमरनाथ मठ, गगनगिरी मठ धारेश्वर दिवशी यांचे भाविकांना दर्शनाचा लाभ होणार आहे. 

सदर कार्यक्रमास सातारा लोकसभा खासदार श्रीनिवास पाटील साहेब, विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी I,T, सेल प्रमुख सारंगबाबा पाटील, सातारा जिल्हा बँक संचालक सत्यजित पाटणकर,  राजे संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक  योगेश पाटणकर, कुंभारगांव ग्रामपंचायत सरपंच सारिका पाटणकर,  रयत सह साखर कारखाना संचालक प्रशांत पाटील, सातारा जि, सह बोर्डाचे संचालक विकास पवार, पाटण पं, समितीचे माजी उपसभापती रमेश मोरे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

रक्तदान शिबिरा साठी एम, डी, (पॅथॉलॉजी )दत्त पॅथॉलॉजी प्रयोगशाळा आणी संशोधन केंद्र कराड यांचे विशेष  सहकार्य राहणार आहे. विभागातील युवकांनी सर्वात श्रेष्ठ दान रक्तदान मोठ्या संख्येने करून सामाजिक बांधिलकी जोपासावी असे आवाहन संयोजकांनी केले आहे. 

तसेच भाविकांनी दर्शन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.