श्री लक्ष्मी अंबाबाई यात्रेनिमित्त कुंभारगांव येथे निकाली कुस्तीचे जंगी मैदान.

   


तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

कुंभारगांव ता पाटण येथील जागृत देवस्थान ग्रामदैवत श्री लक्ष्मी अंबाबाई देवीची यात्रा मंगळवार दि 8/11/2022 रोजी भर तर बुधवार दि 9/11/2022 रोजी यात्रेचा मुख्य दिवस, खेळणे होणार असून या यात्रेची नियोजनाची यात्रा कमिटीची मिटिंग सांस्कृतिक भवन येथे पार पडली. मंगळवार दि 8/10/2022 रोजी पहाटे ग्रामदेवतेचा अभिषेक, काकड आरती तसेच सकाळ पासून सायंकाळ पर्यंत नवसाचे दंडस्थान सायंकाळी 7 ते 9 पर्यंत यात्रेचा भंडारा, रात्री 10,30 वाजता परिसरातून यात्रेसाठी येणाऱ्या देव, देवतांच्या पालख्यांचे स्वागत ग्रामस्थ व यात्राकमेटी यांच्यामार्फत करण्यात येणार असून त्यानंतर रात्री अशोकराव भोसले धोंडेवाडीकर यांचा लोकनाट्य तमाशा होणार असून सकाळी 6 ते 10 वाजेपर्यत देव, देवतांच्या पालख्या, सासनकाठ्या सह छबिना सकाळी 10:30 ते 3 पर्यंत दिवसाचा लोकनाट्य तमाशा, दुपारी 3 ते सायंकाळ पर्यंत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान भरणार असून कुस्तीसाठी इच्छुकांनी यात्रा कमिटीशी संपर्क करावा असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.


 यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अर्थ, शिक्षण, सभापती संजय देसाई, राजे संघर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पाटणकर,कुंभारगांव ग्रामपंचायत उपसरपंच राजेंद्र चव्हाण,ग्रामपंचायत सदस्य किशोर चव्हाण, पाटण तालुका युवक कॉग्रेसचे उपाध्यक्ष उदयसिंह चव्हाण, पाटण ता, राष्ट्रवादी उपाध्यक्ष राजेंद्र देसाई, ,युवराज चव्हाण,प्रदीप देसाई, दिपक चव्हाण,संजय गुरव, अनिल गायकवाड, रविंद्र सुपेकर आदि उपस्थित होते.